यवतमाळ जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या

यवतमाळ जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या
यवतमाळ जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या

यवतमाळ : पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत. पेरणीचा कालावधी निघून जात असल्याने उत्पन्नावर त्याचा परिणाम होण्याची शक्‍यता आहे.   जिल्ह्यात अजूनही पावसाची दमदार हजेरी लागली नाही. त्याचा परिणाम पेरणीवर झाला आहे. मृगनक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आद्राकडे आहे. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील काही भागांत वरुणराजाने हजेरी लावली. मात्र, दुसऱ्यादिवशी पुन्हा उन्हाचे चटके बसू लागले आहेत. जून महिना कोरडा गेल्याने पेरणीचे वेळापत्रक पूर्ण बदलले आहे. या सर्व परिस्थितीचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होण्याची दाट शक्‍यता आहे. पेरणीसाठी कर्ज मिळाले नसल्याने अनेक शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांजवळ पेरणीसाठी आर्थिक जुळवाजुळव झाली नाही. परिणामी, पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत हवी असते. मात्र, यंदा शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, अजूनही शेतकऱ्यांसाठी पीक कर्जवाटपाला म्हणावी तशी गती मिळालेली दिसून येत नाही. शेतकऱ्यांना अजूनपर्यंत खरीप हंगामासाठी पीककर्ज मिळालेले नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे दिसून येते आहे. एकीकडे उधारीवर पेरणी करण्याची वेळ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांवर आलेली आहे. तर दुसरीकडे पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर झालेले बघावयास मिळत आहेत. पेरणीसाठी शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत आहेत.  १६४ मिमी पाऊस जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ९११.३४ मिलिमीटर आहे. यंदा २२ दिवसांत केवळ १६४.३४ मिमी पाऊस कोसळला आहे. वाढलेले तापमान जमिनीत नसलेला ओलावा, यामुळे सध्यातरी जमीन पेरणीस योग्य नसल्याचे मत कृषी तज्ज्ञांचे आहे. आत्तापर्यंत यवतमाळ तालुक्‍यात १७०.५९, बाभूळगाव १७०.९९, कळंब १७०.९९, आर्णी १४७.२६, दारव्हा १४५.१६, दिग्रस १४८.१९, नेर १३७.०५, पुसद १४२.६२, उमरखेड १६३.४१, महागाव १५४.७९, केळापूर १८०.७४, घाटंजी १८५.९५, राळेगाव १८५.९५, वणी १७०.९९, मारेगाव १७७.३७, झरी जामणी १७७.३७. पेरणी रखडली यंदा साडेनऊ लाख हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केलेले आहे. आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणावर पेरणी होणे अपेक्षित होते. पावसाने दडी मारल्याने पेरणीचे प्रमाण नगण्यच आहे. खरीप हंगामाच्या सुरवातीलाच शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले दिसून येत आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com