मुंबई ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्त
अॅग्रो विशेष
देशात सोयाबीन लागवडीत ११ टक्के घट
देशात कमी झाला असला आणि महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयबीनची कमी लागवड झाली असली, तरीही येणाऱ्या काळात पेरणी वेग घेईल. येत्या काही दिवसांमध्ये पाऊस झाल्यास लागवड क्षेत्र मागील वर्षीएवढे होईल.
- दाविश जैन, चेअरमन, भारतीय सोयाबीन प्रक्रिया असोसिएशन
नवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्याने खरीप पेरणीवर परिणाम झाला आहे. सोयाबीनची पेरणी मागील वर्षीच्या तुलनेत ११ टक्के घट झाली आहे. आतापर्यंत देशात ७९.८ लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली आहे. देशात २०१८-१९ जानेवारी ते जून या काळात १०८ लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होता.
सोयाबीन हे देशातील महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. एकूण तेलबिया उत्पादनात सोयाबीनचा वाटा तब्बल ४० टक्के आहे. सोयाबीनच्या उत्पादनात घट झाल्यास देशाला मोठी खाद्यतेल आयात करावी लागेल. २०१८-१९ मध्ये विक्रमी ११४.८ लाख टन सोयाबीनचे उत्पादन झाले होते. तर, २०१७-१८ मध्ये ८३.७ लाख टन उत्पादन झाले होते.
देशात यंदा उशिरा आगमन झाल्यानंतर सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये यंदा पावसाने पेरणीयोग्य अशी हजेरी लावली नाही. त्यामुळे अनेक भागांत खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. पर्यायाने सोयाबीन पेरणीही गेल्या वर्षीच्या तुलनेत ११ टक्क्यांनी घटली आहे. यात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक फटका बसला आहे. महाराष्ट्रत आतापर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत १७.३ टक्के कमी सोयाबीन पेरणी झाली आहे. तर, मध्य प्रदेशात ८.१ टक्के कमी पेरा झाला आहे.
भारतीय सोयाबीन प्रक्रिया असोसिएशनचे चेअरमन दाविश जैन म्हणाले, की देशात २०१८-१९ जानेवारी ते जून या काळात १०८ लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. मात्र, येणाऱ्या काळात पाऊस झल्यास शेतकरी इतर तेलबिया ज्यांचे उत्पादन घेणे थोडे काळजीचे आणि दराबाबात निश्चितता नाही अशा पिकांपेक्षा सोयाबीन लागवडीला प्राधान्य देतील. त्यामुळे खरीप पेरणीसाठी जे काही दिवस शिल्लक आहेत; त्यात सोयाबीनचा पेरा वाढेल आणि क्षेत्र १०८ लाख हेक्टरपर्यंत जाईल, अशी शक्यता आहे.
मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये तेलबीया पीक धोक्यात
प्रक्रिया उद्योजक गोविंदभाई पटेल म्हणाले, की पावसाअभावी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या महत्त्वाच्या तेलबिया उत्पादक राज्यांमध्ये पिके धोक्यात आहेत. या राज्यांतील महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक भागांत पेरणीयोग्य पाऊस नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत किंवा ज्या भागात पेरण्या झाल्या; तेथे पाण्याअभावी पीक संकटात आहे. मध्य भारतात चांगल्या उत्पादकतेसाठी सोयाबीनची जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत लागवड करतात.
महाराष्ट्रात १७ टक्के घट
राज्यात यंदा मॉन्सूनने उशिरा हजेरी लावल्यानंतरही सर्वसमावेशक असा पाऊस झाला नाही. राज्यातील महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक मराठवाडा आणि विदर्भ या विभागांत अद्यापही पेरणीयोग्य पावसाने हजेरी लावली नसल्याने खरीप पेरण्या रखडल्या आहेत. ज्या भागांत थोड पाऊस झाला तेथे शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा केला. मात्र, पावसाअभावी पेरण्या रखडल्याने राज्यात यंदा १७.३ टक्के कमी सोयाबीन पेरणी झाली आहे. ‘‘पेरणीयोग्य पाऊस नसल्याने आधीच पेरणीस जवळपास तीन आठवडे उशीर होऊनही विदर्भ आणि मराठवाडा या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या विभागांमध्ये अद्यापही पेरणी झालेली नाही,’’ असे प्रक्रिया उद्योजक गोविंदभाई पटेल म्हणाले.
प्रतिक्रिया
पावसाअभावी अनेक भागांत सोयाबीन पेरणी रखडली आहे. मात्र, उशिरा पेरणीमुळे उत्पादनातील घट टाळण्यासाठी शेतकरी कमी कालावधीच्या आणि उशिरा लागवडीच्या वाणांची पेरणी करीत आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येणार नाही.
- व्ही. एस. भाटिया, संचालक, सोयाबीन संशोधन
तुलनात्मक राज्यनिहाय सोयाबीन पेरणी (हेक्टरमध्ये)
राज्य | २०१९-२० | २०१८-१९ | वाढ-घट |
तेलंगणा | १,५५,९०० | १७०,८०० | (-)८.७ |
बिहार | २७,००० | १७,००० | ५८.८ |
छत्तीसगड | ५५,४०० | १०९,८०० | (-)४९.५ |
गुजरात | ७९,७०० | १०४,६०० | (-)२३.८ |
कर्नाटक | १,८८,४०० | ३,१५,४०० | (-)४०.३ |
मध्य प्रदेश | ४०,८१,००० | ४४,४१,००० | (-)८.१ |
महाराष्ट्र | २३,११,८०० | २७,९५,८०० | (-)१७.३ |
राजस्थान | १०,१८,५०० | ९,४५,४०० | ७.७ |
उत्तर प्रदेश | १२,९०० | १४,५०० | (-)११.० |
उत्तराखंड | २०,००० | २२,००० | (-)९.१ |
- 1 of 436
- ››