पुणे जिल्ह्यात उन्हाळी बाजरीची २ हजार हेक्टरवर पेरणी

पुणे ः दरवर्षी उन्हाळी हंगामात रोग, किडीचा प्रादुर्भाव होत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी बाजरीकडे वळत आहेत. यंदाही शेतकऱ्यांचा उन्हाळी बाजरी पिकांकडे अधिक ओढा आहे.
Sowing of summer bajra on 2000 hectares in Pune district
Sowing of summer bajra on 2000 hectares in Pune district

पुणे ः दरवर्षी उन्हाळी हंगामात रोग, किडीचा प्रादुर्भाव होत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी बाजरीकडे वळत आहेत. यंदाही शेतकऱ्यांचा उन्हाळी बाजरी पिकांकडे अधिक ओढा आहे. शेतकऱ्यांनी दोन हजार २१७ हेक्टरवर पेरणी केली आहे. यामध्ये जुन्नर तालुका अव्वल आहे. पेरणीच्या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता जिल्हा अधिक्षक कृषी विभागातील सूत्रांनी वर्तविली.

पावसाळ्यात अधिक पाऊस असल्याने रोग किडीचा मोठा प्रादुर्भाव बाजरी पिकांवर होतो. त्याचा परिणाम होऊन उत्पादनात घट होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाळ्यात बाजरी पीक घेण्याएेवजी ते उन्हाळ्यात घेण्यावर भर दिला आहे. उन्हाळ्यात चांगले उत्पादन मिळत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांचा आहे.

याशिवाय चांगल्या दर्जाचा चाराही उन्हाळ्यात उपलब्ध होतो. त्यामुळे आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजरीची पेरणी करत आहेत. यंदा जुन्नर तालुक्यात सर्वाधिक लागवड बाजरीची झाली आहे. यात नारायणगाव, खोडद, बोरी, बेल्हे, हिवरेतरफे, आळेफाटा, मांजरवाडी, वारूळवाडी, ओतूर,रोकडी, उंब्रज, डिंगोरे, आर्वी, कुरण, कांदळी, निमगाव चावा, तर खेडमधील वाफगाव, कळूस, दावडी, गुंडाळवाडी, बुरसेवाडी आदी गावात बाजरीची मोठी पेरणी झाली.

पावसाळ्यात रोग, किडीमुळे उत्पादन घटते. उन्हाळी हंगामात रोग, किडीचा प्रादुर्भाव फारसा होत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी उन्हाळी हंगामातील बाजरीची पेरणी करतात. यंदा जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. - ज्ञानेश्वर बोठे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, पुणे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com