agriculture news in marathi Sowing of summer bajra on 2000 hectares in Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्यात उन्हाळी बाजरीची २ हजार हेक्टरवर पेरणी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

पुणे ः दरवर्षी उन्हाळी हंगामात रोग, किडीचा प्रादुर्भाव होत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी बाजरीकडे वळत आहेत. यंदाही शेतकऱ्यांचा उन्हाळी बाजरी पिकांकडे अधिक ओढा आहे.

पुणे ः दरवर्षी उन्हाळी हंगामात रोग, किडीचा प्रादुर्भाव होत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी बाजरीकडे वळत आहेत. यंदाही शेतकऱ्यांचा उन्हाळी बाजरी पिकांकडे अधिक ओढा आहे. शेतकऱ्यांनी दोन हजार २१७ हेक्टरवर पेरणी केली आहे. यामध्ये जुन्नर तालुका अव्वल आहे. पेरणीच्या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता जिल्हा अधिक्षक कृषी विभागातील सूत्रांनी वर्तविली.

पावसाळ्यात अधिक पाऊस असल्याने रोग किडीचा मोठा प्रादुर्भाव बाजरी पिकांवर होतो. त्याचा परिणाम होऊन उत्पादनात घट होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाळ्यात बाजरी पीक घेण्याएेवजी ते उन्हाळ्यात घेण्यावर भर दिला आहे. उन्हाळ्यात चांगले उत्पादन मिळत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांचा आहे.

याशिवाय चांगल्या दर्जाचा चाराही उन्हाळ्यात उपलब्ध होतो. त्यामुळे आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजरीची पेरणी करत आहेत.
यंदा जुन्नर तालुक्यात सर्वाधिक लागवड बाजरीची झाली आहे. यात नारायणगाव, खोडद, बोरी, बेल्हे, हिवरेतरफे, आळेफाटा, मांजरवाडी, वारूळवाडी, ओतूर,रोकडी, उंब्रज, डिंगोरे, आर्वी, कुरण, कांदळी, निमगाव चावा, तर खेडमधील वाफगाव, कळूस, दावडी, गुंडाळवाडी, बुरसेवाडी आदी गावात बाजरीची मोठी पेरणी झाली.

पावसाळ्यात रोग, किडीमुळे उत्पादन घटते. उन्हाळी हंगामात रोग, किडीचा प्रादुर्भाव फारसा होत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी उन्हाळी हंगामातील बाजरीची पेरणी करतात. यंदा जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे.
- ज्ञानेश्वर बोठे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, पुणे.


इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...