पावसाअभावी विदर्भात तीन टक्के क्षेत्रावर पेरण्या

पेरणी योग्य पाऊस न झाल्यामुळे विदर्भात पेरण्या रखडल्या आहेत. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत ३.६८ तर अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत अवघ्या तीन टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
पावसाअभावी विदर्भात तीन टक्के क्षेत्रावर पेरण्या Sowing on three per cent area in Vidarbha due to lack of rainfall
पावसाअभावी विदर्भात तीन टक्के क्षेत्रावर पेरण्या Sowing on three per cent area in Vidarbha due to lack of rainfall

नागपूर : पेरणी योग्य पाऊस न झाल्यामुळे विदर्भात पेरण्या रखडल्या आहेत. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत ३.६८ तर अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत अवघ्या तीन टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. शंभर मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय सोयाबीन पेरणी न करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. या जागृतीच्या परिणामी देखील सोयाबीन लागवड झाली नाही.  नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांपैकी पाच जिल्ह्यांमध्ये धान लागवड होते. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यात ७९ हजार ९५४, भंडारा १ लाख ८० हजार ११९, गोंदिया ११००९४, चंद्रपूर १ लाख ४६ हजार ८१० तर गडचिरोली जिल्ह्यात १ लाख ५१ हजार २०८ हेक्टर धानाखालील क्षेत्र आहे. नागपूर विभागात ७ लाख ३५ हजार १८५ हेक्‍टरवर धानाची लागवड होते. हमखास पावसाचा जिल्हे म्हणून पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांची ओळख आहे. मात्र यावेळी पावसाने हुलकावणी दिल्याने अद्याप धान लागवडीला सुरुवात झाली नाही. वर्धा जिल्ह्यात ४ हजार हेक्टर क्षेत्रावर मका लागवड झाली आहे. तुरीचे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये १ लाख ९५ हजार ४०९ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात ७३१२ एकर क्षेत्रावर लागवड झाली आहे. कडधान्याची नागपूर विभागातील लागवड तीन टक्के आहे. नागपूर विभागात सोयाबीनचे ५ लाख २७ हजार २६८ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी ४०७२ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. कापसाचे नागपूर विभागात ४ लाख ५१ हजार ८०६ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ५८ हजार ८८९ हेक्‍टर क्षेत्रावर आतापर्यंत लागवड झाली आहे. नागपूर विभागातील खरिपाचे एकूण क्षेत्र १९ लाख ११ हजार २९२ हेक्टर असून, त्यापैकी ७० हजार २७७ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. लागवडीची एकूण टक्केवारी ३.६८ आहे. 

अमरावती विभागात तीन टक्के क्षेत्रावर पेरणी अमरावती विभागात देखील पेरणी योग्य पाऊस झाला नाही. परिणामी विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये देखील पेरण्या रखडल्या आहेत. पाच जिल्ह्यांत तीन टक्के क्षेत्रावरच पेरणी झाल्याचे कृषी विभागाने सांगितले. यवतमाळ जिल्ह्यात ४ लाख ४०८ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड प्रस्तावित आहे. त्यापैकी ५४ हजार हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. यवतमाळ जिल्ह्याने कापूस लागवडीत आघाडी घेतली आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत ९ लाख ८८ हजार ७२५ हेक्‍टर क्षेत्र कापसाखाली आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये सात टक्के क्षेत्रावर कापसाची पेरणी आटोपली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com