Agriculture news in marathi Sowing on three per cent area in Vidarbha due to lack of rainfall | Agrowon

पावसाअभावी विदर्भात तीन टक्के क्षेत्रावर पेरण्या

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 जून 2021

पेरणी योग्य पाऊस न झाल्यामुळे विदर्भात पेरण्या रखडल्या आहेत. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत ३.६८ तर अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत अवघ्या तीन टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

नागपूर : पेरणी योग्य पाऊस न झाल्यामुळे विदर्भात पेरण्या रखडल्या आहेत. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत ३.६८ तर अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत अवघ्या तीन टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. शंभर मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय सोयाबीन पेरणी न करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. या जागृतीच्या परिणामी देखील सोयाबीन लागवड झाली नाही. 

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांपैकी पाच जिल्ह्यांमध्ये धान लागवड होते. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यात ७९ हजार ९५४, भंडारा १ लाख ८० हजार ११९, गोंदिया ११००९४, चंद्रपूर १ लाख ४६ हजार ८१० तर गडचिरोली जिल्ह्यात १ लाख ५१ हजार २०८ हेक्टर धानाखालील क्षेत्र आहे. नागपूर विभागात ७ लाख ३५ हजार १८५ हेक्‍टरवर धानाची लागवड होते. हमखास पावसाचा जिल्हे म्हणून पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांची ओळख आहे. मात्र यावेळी पावसाने हुलकावणी दिल्याने अद्याप धान लागवडीला सुरुवात झाली नाही.

वर्धा जिल्ह्यात ४ हजार हेक्टर क्षेत्रावर मका लागवड झाली आहे. तुरीचे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये १ लाख ९५ हजार ४०९ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात ७३१२ एकर क्षेत्रावर लागवड झाली आहे. कडधान्याची नागपूर विभागातील लागवड तीन टक्के आहे. नागपूर विभागात सोयाबीनचे ५ लाख २७ हजार २६८ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी ४०७२ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.

कापसाचे नागपूर विभागात ४ लाख ५१ हजार ८०६ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ५८ हजार ८८९ हेक्‍टर क्षेत्रावर आतापर्यंत लागवड झाली आहे. नागपूर विभागातील खरिपाचे एकूण क्षेत्र १९ लाख ११ हजार २९२ हेक्टर असून, त्यापैकी ७० हजार २७७ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. लागवडीची एकूण टक्केवारी ३.६८ आहे. 

अमरावती विभागात तीन टक्के क्षेत्रावर पेरणी
अमरावती विभागात देखील पेरणी योग्य पाऊस झाला नाही. परिणामी विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये देखील पेरण्या रखडल्या आहेत. पाच जिल्ह्यांत तीन टक्के क्षेत्रावरच पेरणी झाल्याचे कृषी विभागाने सांगितले. यवतमाळ जिल्ह्यात ४ लाख ४०८ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड प्रस्तावित आहे. त्यापैकी ५४ हजार हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्याने कापूस लागवडीत आघाडी घेतली आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत ९ लाख ८८ हजार ७२५ हेक्‍टर क्षेत्र कापसाखाली आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये सात टक्के क्षेत्रावर कापसाची पेरणी आटोपली आहे.


इतर ताज्या घडामोडी
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...
कोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...
नाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......
सिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...
रत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...
नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...
नगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...
कोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...
राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...
विमा कंपनीचा कारभार चालतोय कृषी...सातारा : जिल्ह्यात खरिपाच्या सुरूवातीस पावसाने...
चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन...रत्नागिरी : ढगफुटीसदृश पावसामुळे चिपळूणकरांचे...
पाणी ओसरताच तातडीने पंचनामेकोल्हापूर : पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य...
शेतकरी नियोजन पीक : कांदाशेतकरी : नंदकुमार काशिनाथ उशीर गाव : धोडंबे, ता...