सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍टरवर पेरणी

आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, पलूस या तालुक्‍यातील मक्‍याच्या पिकावर काही प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यावर उपाययोजना सुरु केल्या आहेत. - बसवराज मास्तोळी, जिल्हा कृषी अधिक्षक, सांगली.
Sowing on two lakh 19 thousand hectares in Sangli district
Sowing on two lakh 19 thousand hectares in Sangli district

सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  पेरणीची गती वाढत आहे. गेल्या आठवड्यात १ लाख ५९ हजार ४८७ हेक्‍टरवर पेरा झाला होता. जूलैच्या दुसऱ्या आठवड्यात २ लाख १९ हजार ६३८ हेक्‍टरवर पेरणी झाली. गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात ६० हजार १९९ हेक्‍टरने वाढ झाली, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, पावसामध्ये खंड पडतो आहे. परंतु, पावसाचे वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी करण्यासाठी गती घेतली आहे. येत्या आठवड्यात पेरणी पूर्ण होण्याची शक्‍यता कृषी विभागाने वर्तवली आहे. बाजरीची ९१ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. मक्‍याचे सरासरी क्षेत्र ३० हजार २९८ हेक्‍टर आहे. ३१ हजार ५३४ हेक्‍टरवर म्हणजे १०४ टक्के पेरणी झाली आहे. 

शिराळा तालुक्‍यात भाताची लागण सुरु झाली असून भाताच्या क्षेत्रात किंचित वाढ होईल. जिल्ह्यात गेल्यावर्षी सोयाबीनचे क्षेत्र ४२ हजार ७०० हेक्‍टर इतके होते. यंदाच्या हंगामात ३७ हजार ३०७ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. गेल्यावर्षीपेक्षा सोयाबीनच्या क्षेत्रात घट होण्याची शक्‍यता आहे. भूईमुगाच्या क्षेत्रात गतवर्षीपेक्षा वाढ झाली आहे. भूईमुगाची पेरणी १०३ टक्के इतकी झाली आहे. सूर्यफूलाच्या क्षेत्रात दरवर्षी घट होत आहे. यंदाच्या खरीप हंगामात सूर्यफूलाचे सरासरी क्षेत्र १२८९ हेक्‍टर इतके आहे. केवळ ६२ हेक्‍टरवर म्हणजे ५ टक्केच लागवड झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com