नांदेड, परभणी, हिंगोलीतील अनेक मंडळांत पेरण्या रखडल्या

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ८१ मंडळांत शुक्रवारी (ता.१९) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. गेल्या दोन- तीन दिवसांपासून या जिल्ह्यांतील पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे अनेक मंडळांतील खरिपाची पेरणी रखडली आहे.
 Sowing was delayed due to lack of rain in many circles in Nanded, Parbhani and Hingoli
Sowing was delayed due to lack of rain in many circles in Nanded, Parbhani and Hingoli

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ८१ मंडळांत शुक्रवारी (ता.१९) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. गेल्या दोन- तीन दिवसांपासून या जिल्ह्यांतील पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे अनेक मंडळांतील खरिपाची पेरणी रखडली आहे.

बियाण्यांची उगवण व्यवस्थित होत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. अतिवृष्टी झालेल्या मंडळांत पेरणी केलेले बियाणे वाहून गेल्यामुळे दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे. 

नांदेड जिल्ह्यातील ५४ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. बिलोली, नायगाव, देगलूर, उमरी, भोकर, मुखेड, धर्माबाद तालुक्यातील काही मंडळामध्ये पाऊस झाला. परंतु, अन्य तालुक्यांत मात्र तुरुळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. परभणी जिल्ह्यातील २४ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.

परभणी, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील अनेक मंडळांत पाऊस झाला. परंतु, जिंतूर, सेलू तालुक्यातील मंडळांमध्ये उघडीप दिली होती. हिंगोली जिल्ह्यातील ३ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. सेनगाव, वसमत तालुक्यातील तीन मंडळे वगळता अन्य तालुक्यातील मंडळांमध्ये उघडीप होती.  मंडळनिहाय पाऊस (मि.मी) ः 

नांदेड जिल्हा ः मुदखेड ३४, तामसा १८,आष्टी १३, माहूर ८, सरसम १२,भोकर ३१, किनी १७, मोघाली ६, मातुल ८, उमरी १७, सिंदी १५, गोळेगाव १४, धर्माबाद १६, जारिकोट २३, करखेली २३, नायगाव २४, नरसी २०, माजंरम १९, बरबडा १०, कुंटूर २७, बिलोली २२, आदमपूर २०, लोहगाव २६, सगरोळी १९, कुंडलवाडी ४२, देगलूर १०, खानापूर १४, शहापूर २०, मरखेल ९, हानेगाव २१, मालेगाव १८, मुखेड ७, जांब ८, येवती २५, जाहूर ३६, चांडोळा १२, मुक्रमाबाद १२, कंधार ६, कुरुला २७, पेठवडज ११, फुलवळ १४, बारुळ ७, लोहा ६, माळाकोळी २१, शेवडी २३, सोनखेड १२.  परभणी जिल्हा ः सिंगणापूर १०, दैठणा २२, जांब ८, सेलू ५, मानवत १६, केकरजवळा १४, पाथरी २६, बाभळगाव २०, हदगाव २७, सोनपेठ २४, आवलगाव २२, गंगाखेड १६, माखणी २२, महातपुरी १०, राणीसावरगाव १०, माखणी २२, पालम ९, चाटोरी १७, बनवस १३, पूर्णा १५, ताडकळस १४, लिमला २६.    हिंगोली जिल्हा ः सेनगाव ७, गोरेगाव १०. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com