Agriculture news in Marathi, Sowing will be done at 2.5 lakh hectare | Agrowon

नगर : खरिपात साडेपाच लाख हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 जून 2019

नगर : गतवर्षी पावसाने दडी मारल्याने खरीप, रब्बी हंगाम बुडाला. मात्र जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

नगर : गतवर्षी पावसाने दडी मारल्याने खरीप, रब्बी हंगाम बुडाला. मात्र जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

त्यामुळे पूर्वमशागतीच्या कामांसाठी लगबग सुरू झाली आहे. कृषी विभागही खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे. पेरणीसाठी ७० हजार क्विंटल विविध पिकांच्या वाणांची मागणी कृषी विभागाने नोंदवली. यापैकी आजअखेर चाळीस हजार क्विंटल मूग, बाजरी, सोयाबीन, तूर, उडीद आदी वाणांचे बियाणे प्राप्त झाले आहेत. कृषी विभागाला साडेपाच लाख हेक्‍टरवर पेरणी होणे अपेक्षित आहे. गतवर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्यात टंचाईचे सावट आहे. चौदा लाख लोकांची तहान भागविण्यासाठी जिल्ह्यात ८४९ टॅंकर धावत आहे. 

जिल्ह्यात ५०४ चारा छावण्या सुरू आहेत. त्यात साडेतीन लाख पशुधन दाखल आहे. मागील चार दिवसांपासून नगर शहरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. कपाशीसाठी तीन लाख ७५ हजार पाकिटे प्राप्त झाली आहेत. यूरिया, डीएपी आदी रासायनिक खतांकरिता कृषी विभागाने दोन लाख दोन हजार टनांचे मागणी नोंदवली होती. त्यापैकी एक लाख ७० हजार टन रासायनिक खते प्राप्त झाली आहेत.

पीकनिहाय पेरा अपेक्षित (हेक्‍टरमध्ये)
भात (१९ हजार), बाजरी (दीड लाख), नागली (एक हजार ९००), तूर (१७ हजार ५००), मूग (४० हजार), उडीद (३५ हजार), सोयाबीन (८५ हजार), भुईमूग (८ हजार), मका (५५ हजार), कापूस (एक लाख ३० हजार).

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...