Agriculture news in marathi, Sowing will be done on an area above average | Page 2 ||| Agrowon

परभणीत सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर होणार पेरणी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

परभणी : जिल्ह्यातील यंदाच्या रब्बी हंगामातील विविध पिकांची प्रतिहेक्टरी उत्पादकता कृषी विभागाने प्रस्तावित केली. त्यानुसार हरभऱ्याची उत्पादकता प्रतिहेक्टरी ९ क्विंटल ३८ किलो, ज्वारीची १४ क्विंटल ९८ किलो, गव्हाची २२ क्विंटल १३ किलो, करडईची ७ क्विंटल १ किलो एवढी उत्पादकता प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी : जिल्ह्यातील यंदाच्या रब्बी हंगामातील विविध पिकांची प्रतिहेक्टरी उत्पादकता कृषी विभागाने प्रस्तावित केली. त्यानुसार हरभऱ्याची उत्पादकता प्रतिहेक्टरी ९ क्विंटल ३८ किलो, ज्वारीची १४ क्विंटल ९८ किलो, गव्हाची २२ क्विंटल १३ किलो, करडईची ७ क्विंटल १ किलो एवढी उत्पादकता प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र २ लाख ७० हजार ७१२ हेक्टर आहे. गतवर्षी दुष्काळामुळे सरासरी क्षेत्रात १ लाख ६ हजार ४४६ हेक्टरने घट होऊन १ लाख ६८ हजार ४५९ हेक्टरवर पेरणी झाली. गतवर्षी ज्वारीची प्रतिहेक्टरी उत्पादकता ७ क्विंटल ८४ किलो, गव्हाची प्रतिहेक्टरी २० क्विंटल ११ किलो, हरभऱ्याची ७ क्विंटल ५ किलो, करडईची ६ क्विंटल २८ किलो एवढी आली होती. यंदा गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे, जायकवाडीचे पाणी मिळणार असल्याने जिल्ह्यातील रब्बीच्या क्षेत्रात ४ हजार ७६३ हेक्टरने वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.

यंदा २ लाख ७५ हजार ४७५ हेक्टरवर रब्बीची, त्यात ज्वारीची १ लाख १४ हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. ज्वारीची प्रतिहेक्टरी उत्पादकता १४ क्विंटल ९८ किलो, गव्हाची ३६ हजार हेक्टरवर पेरणी; तर उत्पादकता २२ क्विंटल १३ किलो, हरभऱ्याची १ लाख १३ हजार २४० हेक्टरवर पेरणी, प्रतिहेक्टरी उत्पादकता ९ क्विंटल ३८ किलो, करडईची २ हजार ५०० हेक्टरवर पेरणी, प्रतिहेक्टरी उत्पादकता ७ क्विंटल १ किलो अपेक्षित आहे.

२०१४-१५ ते २०१८-१९ या पाच वर्षांत ज्वारीची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ७ क्विंटल ८१ किलो, गव्हाची १३ क्विंटल ८२ किलो, हरभऱ्याची ६ क्विंटल १२ किलो, करडईची प्रतिहेक्टरी उत्पादकता ४ क्विंटल ७२ किलो आली होती. यंदा जमिनीतील उपलब्ध ओलावा, सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन या प्रमुख रब्बी पिकांच्या उत्पादकतेत वाढ अपेक्षित आहे.


इतर बातम्या
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
भांबेडला एक हेक्टर भातशेतीचे नुकसानरत्नागिरी ः जिल्ह्यात गेले दोन जोरदार पडत आहे....
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...