अकोल्यात सोयाबीनला सरासरी ३१०० रुपये दर

अकोल्यात सोयाबीनला सरासरी ३१०० रुपये दर
अकोल्यात सोयाबीनला सरासरी ३१०० रुपये दर

अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचा सरासरी दर ३१०० रुपयांपर्यंत पोचला अाहे. शनिवारी (ता. २७) सोयाबीनची अावक ४९३३ क्विंटल झाली होती. सोयाबीनचा दर कमीत कमी २५८० व जास्तीत जास्त ३१७० रुपये होता. मागील चार दिवसांत सोयाबीनच्या दरात थोडी सुधारणा झाली अाहे.

अागामी दिवाळी सण तसेच रब्बी पिकांची लागवडीसाठी हवे असलेल्या पैशांची गरज भागवण्यासाठी सोयाबीनची विक्री वाढली अाहे. या अाठवड्यात बुधवारी अाठ हजार पोत्यांपेक्षा अधिक अावक झाली होती. ही अावक अाणखी वाढतच जाणार अाहे, असे व्यापारी सूत्रांचे म्हणणे होते. येथील बाजार समितीत सोयाबीन पाठोपाठ हरभऱ्याची अावकही मोठ्या प्रमाणात अाहे.

शनिवारी ७१७ पोते हरभरा विक्रीला अाला. हरभऱ्याच्या सरासरी दरात १०० रुपयांची घट झाली अाहे. २४ अाॅक्टोबरला ३५०० ते ४१०० दरम्यान विक्री झालेला हरभरा शनिवारी ३५५० ते ३८५० असा विकला. सरासरी दर ३८०० वरून ३७०० झाला. मुगाची अावक ४१४ क्विंटलची झाली होती. मुगाच्या दरात तीनशे ते चारशे रुपयांची अचानक वाढ झाली. चार दिवसांपूर्वी ४२०० ते ५६०० या दरम्यान विकलेला मूग शनिवारी ४५०० ते ६००० दरम्यान विक्री झाला.

उडदाच्या दरातही १०० ते २५० रुपयांची वाढ दिसून येत अाहे. उडीद कमीत कमी ४००० व जास्तीत जास्त ४७५० रुपये दराने विकला. सरासरी ४४०० रुपये भाव होता. ३१७ क्विंटलची अावक होती. तुरीची २१८ पोत्यांची अावक झाली. तुरीला ३५०० ते ३८०० दरम्यान भाव भेटला. सरासरी ३६५० रुपये दर होता. ज्वारीची अावक वाढू लागली. ज्वारीचा भाव १२५० ते १६७५ होता. ८८ क्विंटल ज्वारीची विक्री झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com