agriculture news in marathi, soya bean seeds fail, parbhani, maharashtra | Agrowon

गेल्या खरिपातील सोयाबीनचे बियाणे झाले नापास
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 जून 2019

आमच्या सोयाबीन बियाणांची उगवशक्ती कमी आल्याच्या कारणामुळे ६० क्विंटल नापास करण्यात आले आहे. यामुळे खूप आर्थिक नुकसान झाले आहे.  परत एकदा बियाणे नमुने काढून उगवशक्ती तपासणी चाचणी घ्यावी. 
- शेषराव शंकरराव चापके, कात्नेश्वर, ता. पूर्णा, जि. परभणी.

परभणी  : २०१८-१९ च्या खरीप हंगामात महाबीजअंतर्गत सोयाबीनचे बीजोत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचे २६२ लॅाटचे १० हजार क्विंटल बियाणे उगवणशक्ती चाचणीत नापास झाले आहे. तापमानवाढीमुळे उगवण शक्ती कमी झाली असल्याचे कारण महाबीजकडून सांगितले जात आहे. परंतु यामुळे सोयाबीन बीजोत्पादकांना मोठा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. नव्याने बियाणाचे नमुने (रिसॅम्पलिग) काढून उगवणशक्ती चाचणी घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

गतवर्षी (२०१८) काढणी हंगामात पाऊस नसल्यामुळे बियाणे खराब झाले नाही. त्यामुळे महाबीजतर्फे राबविण्यात आलेल्या सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमातून १ लाख ६० हजारांवर क्विंटल बियाणे उत्पादन मिळाले. महाबीजच्या येथील बीजप्रक्रिया केंद्राची ९० हजार क्विंटलपर्यंत बियाणे ग्रेडिगची क्षमता आहे. बियाणे उत्पादन वाढल्याने ग्रेडिंगसाठी सिंगणापूर, हिंगोली जिल्ह्यातील चार ठिकाणच्या प्रक्रिया केंद्रामध्ये शेतकऱ्यांचे बियाणे पाठविण्यात आले.

ग्रेडिंगनंतर उगवणशक्ती तपासणीसाठी बियाणे नमुने काढून कृषी विभागाच्या परभणी येथील बीजपरीक्षण प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले. उगवशक्ती तपासण्याची प्रक्रिया दरवर्षी एप्रिलमध्ये संपत असते. परंतु, बियाणे उत्पादन वाढल्यामुळे उगवणशक्ती तपासणी चाचण्या अद्याप सुरू आहेत. 

परभणी येथील बीजप्रक्रिया केंद्रातील १७३ लॅाटचे ६ हजार ५९६ क्विंटल आणि सिंगणापूर येथील केंद्रातील ८९ लॅाटचे ३ हजार ६६२ क्विंटल सोयाबीनच्या बियाणे उगवणशक्ती कमी आल्यामुळे नापास झाले आहे. सलग ६० लॅाटचे बियाणे नापास झाल्याच्या कारणांचा शोध घेणेदेखील आवश्यक आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील केंद्रावरील नापास बियाणांची आकडेवारी उपलब्ध झाल्यास नापासाचे प्रमाण वाढणार आहे. वाढत्या तापमानाचा उगवणशक्तीवर झाला असल्याचे कारण महाबीजकडून सांगतिले जाते. बियाणे नापास झालेल्या शेतकऱ्यांना महाबीजने दिलेली प्रतिक्विंटल अडीच हजार रुपये एवढी अग्रीम रक्कम परत करावी लागणार आहे. नापास बियाणांची खुल्या बाजारात विक्री करावी लागणार आहे. बाजारभाव कमी झाले आहेत. शिवाय लो ग्रेडचे बियाणे दिले जाते. त्यामुळे दर कमी मिळतात. नापास बियाणांमुळे बीजोत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे सोयाबीन बियाणांचे नव्याने नमुने काढून उगवणशक्ती तपासावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी महाबीजकडे केली आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...