औरंगाबाद :सोयाबीनची सरासरीच्या दीडपट क्षेत्रावर पेरणी

औरंगाबाद : सोयाबीनची सरासरी क्षेत्राच्या दीडपट क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कपाशीचे क्षेत्र मात्र १३ टक्‍क्‍यांनी घटले आहे. कपाशीच्या क्षेत्रात बीड जिल्ह्यात सर्वाधिक ३० टक्‍के घट नोंदली गेली.
soyabean average Sowing on half area
soyabean average Sowing on half area

औरंगाबाद : सोयाबीनची सरासरी क्षेत्राच्या दीडपट क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कपाशीचे क्षेत्र मात्र १३ टक्‍क्‍यांनी घटले आहे. कपाशीच्या क्षेत्रात बीड जिल्ह्यात सर्वाधिक ३० टक्‍के घट नोंदली गेली. तर जालना जिल्ह्यात १० टक्‍के व औरंगाबाद जिल्ह्यात ११ टक्‍के कपाशीचे क्षेत्र घटल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली.

येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत जालना जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या अधिक खरिपाची पेरणी झाली आहे. दुसरीकडे बीड व औरंगाबाद जिल्ह्यात अजूनही सरासरी क्षेत्राच्या तुलनेत पेरणी झालेली नाही. तीनही जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ९७ टक्‍के पेरणी उरकल्याचे चित्र आहे. 

यंदाच्या खरीप हंगामासाठी औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी क्षेत्र ६ लाख ७५ हजार १७० हेक्‍टर आहे. त्या तुलनेत ६ लाख ४१ हजार ५६५ हेक्‍टरवर पेरणी झाली. जवळपास ५ टक्‍के क्षेत्र अजूनही पेरणीविना आहे. बीड जिल्ह्यात सरासरी क्षेत्र ७ लाख ४६ हजार ४८ हेक्‍टर आहे. त्या तुलनेत ७ लाख ३५ हजार ५९१ हेक्‍टरवर पेरणी झाली. बीडमध्ये जवळपास २ टक्‍के क्षेत्रावर पेरणी बाकी आहे. जालना जिल्ह्यात सरासरी क्षेत्र ६ लाख १ हजार ६६१ हेक्‍टर, तर ६ लाख १ हजार ८४१ हेक्‍टरवर पेरणी आहे. 

तीनही जिल्ह्यांत ज्वारीची पेरणी सरासरीच्या केवळ ३२ टक्‍के क्षेत्रावर झाली आहे. बाजरीची ६३ टक्‍के, तर मक्याची ८९ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. भुईमुगाचे सरासरी क्षेत्र १०८०२ हेक्‍टर, तर प्रत्यक्षात १२९२९ हेक्‍टरवर भूईमुगाची पेरणी झाली. तिळाचे सरासरी क्षेत्र २६१४ हेक्‍टर आहे. तर प्रत्यक्षात ११७७ हेक्‍टरवरच त्याची पेरणी झाली. कारळाचे सरासरी क्षेत्र ४५२ हेक्‍टर, तर पेरणी १७६ हेक्‍टर झाली आहे. सूर्यफुलाचे सरासरी क्षेत्र ३७० हेक्‍टर आहे. प्रत्यक्ष पेरणी ६८ हेक्‍टरवर झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com