नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेले ६० दिवस दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्य
बातम्या
सोयाबीन भिजल्याने वाढल्या अडचणी
अमरावती ः शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसात भिजल्याने तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे.
यावर्षी उशिरा का होईना सर्वत्र पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला होता. सोयाबीन, कपाशीसह इतर पिकांची स्थितीदेखील समाधानकारक होती. गेल्या तीन-चार वर्षांतील नुकसानीची भरपाई या वेळी भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, शेतकऱ्यांचा हा अंदाज चुकीचा ठरला असून शुक्रवार (ता. १८) पासून वातावरणात बदल होत मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे शेतात काढणीनंतर मळणीसाठी गंजी लावून ठेवलेले सोयाबीन पीक भिजले आहे.

परिणामी, शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने चिंतेचे वातावरण आहे. शुक्रवारी दुपारी तिवसा तालुक्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. सोयाबीन हे शेतकऱ्यांसाठी नजीकच्या काळात नगदी पीक ठरले होते.
दिवाळीपूर्वी सोयाबीनची कापणी करून त्याच्या विक्रीतून सण साजरा करायची तयारी शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, ऐन सोंगून ठेवलेल्या सोयाबीनवर पाऊस आल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. पावसामुळे काही शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या गंज्या झाकून ठेवल्या आहेत, तर काहींचे सोयाबीन भिजल्या गेले. सध्या बाजारात सोयाबीनचे दर कमी असल्याने त्यामुळे देखील शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे.
सुरवातीला पावसाने खंड दिल्याने पेरणीला उशीर झाला. त्याचा देखील उत्पादनावर परिणाम दिसून येत आहे. अशातच आता पावसाने हजेरी लावल्याने काढणी केलेले सोयाबीन भिजत नुकसान झाले. त्यातच बाजारात दर नसल्याने तिहेरी संकटांचा सामना शेतकरी करीत आहे.
- प्रवीण निकाळजे, युवा शेतकरी, तिवसा
- 1 of 1501
- ››