लातूरला सोयाबीनचा भाव साडे पाच हजारावर

लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात गेल्या काही दिवसापासून सोयाबीनच्या भाव वाढू लागले आहेत. सरासरी साडे पाच हजार रुपये भाव प्रति क्विंटलला मिळत आहे.
लातूरला सोयाबीनचा भाव साडे पाच हजारावर
लातूरला सोयाबीनचा भाव साडे पाच हजारावर

लातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात गेल्या काही दिवसापासून सोयाबीनच्या भाव वाढू लागले आहेत. सरासरी साडे पाच हजार रुपये भाव प्रति क्विंटलला मिळत आहे. पण मंगळवारी (ता. २३) मात्र कमाल पाच हजार आठसे, किमान पाच हजार पाचसे तर सर्वसाधारण पाच हजार सातशे भाव राहिला. या हंगामातील आतापर्यंतचा हा सर्वाधिक भाव होता.  लातूर  येथील आडत बाजार हा मराठवाड्यातील सर्वात महत्वाचा आहे. येथे मोठ्य़ा प्रमाणात सोयाबीनची आवक असते. गेल्या दोन तीन महिन्यापासून साडे चार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलला भाव राहिला. पण गेल्या काही दिवसापासून दररोज सोयाबीनच्या भावात वाढ होताना दिसत आहे. सरासरी तर साडे पाच हजार रुपये भाव मिळतच आहे. पण मंगळवार मात्र सोयाबीनला अधिक भाव देवून गेला. बाजार समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या सौद्यात सोयाबीनला प्रति क्विंटलला पाच हजार ८०५ कमाल भाव राहिला. किमान भाव पाच हजार ५६५ होता. तर सर्वसाधारण भाव पाच हजार ७०० रुपये राहिला. सध्या दररोज वीस ते पंचेवीस हजार क्विंटल सोयाबीनची आवक आहे. सोयाबीनला भाव चांगला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱयात समाधान व्यक्त केले जात आहे.या हंगामातील हा सर्वाधिक भाव आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱयांच्या खिशात यातून पैसा येत आहे. प्रतिक्रिया... सध्या  बाजारात सोयाबीनची वीस ते पंचेवीस हजार क्विंटल आवक आहे. मंगळवारी सौद्यात सोयाबीनला चांगला भाव मिळाला आहे. पण गेल्या काही दिवसापासून सरासरी साडे पाच हजार रुपये प्रति क्विंटलला भाव मिळत आहे. शेतकरय़ांच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे. - ललितभाई शहा, सभापती, लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समिती, लातूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com