agriculture news in marathi Soyabean Crosses five thousand Five hundred in Latur APMC | Page 4 ||| Agrowon

लातूरला सोयाबीनचा भाव साडे पाच हजारावर

ॲग्रोवन वृत्तसेवा
बुधवार, 24 मार्च 2021

लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात गेल्या काही दिवसापासून सोयाबीनच्या भाव वाढू लागले आहेत. सरासरी साडे पाच हजार रुपये भाव प्रति क्विंटलला मिळत आहे.

लातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात गेल्या काही दिवसापासून सोयाबीनच्या भाव वाढू लागले आहेत. सरासरी साडे पाच हजार रुपये भाव प्रति क्विंटलला मिळत आहे. पण मंगळवारी (ता. २३) मात्र कमाल पाच हजार आठसे, किमान पाच हजार पाचसे तर सर्वसाधारण पाच हजार सातशे भाव राहिला. या हंगामातील आतापर्यंतचा हा सर्वाधिक भाव होता. 

लातूर  येथील आडत बाजार हा मराठवाड्यातील सर्वात महत्वाचा आहे. येथे मोठ्य़ा प्रमाणात सोयाबीनची आवक असते. गेल्या दोन तीन महिन्यापासून साडे चार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलला भाव राहिला. पण गेल्या काही दिवसापासून दररोज सोयाबीनच्या भावात वाढ होताना दिसत आहे. सरासरी तर साडे पाच हजार रुपये भाव मिळतच आहे. पण मंगळवार मात्र सोयाबीनला अधिक भाव देवून गेला.

बाजार समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या सौद्यात सोयाबीनला प्रति क्विंटलला पाच हजार ८०५ कमाल भाव राहिला. किमान भाव पाच हजार ५६५ होता. तर सर्वसाधारण भाव पाच हजार ७०० रुपये राहिला. सध्या दररोज वीस ते पंचेवीस हजार क्विंटल सोयाबीनची आवक आहे. सोयाबीनला भाव चांगला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱयात समाधान व्यक्त केले जात आहे.या हंगामातील हा सर्वाधिक भाव आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱयांच्या खिशात यातून पैसा येत आहे.

प्रतिक्रिया...
सध्या  बाजारात सोयाबीनची वीस ते पंचेवीस हजार क्विंटल आवक आहे. मंगळवारी सौद्यात सोयाबीनला चांगला भाव मिळाला आहे. पण गेल्या काही दिवसापासून सरासरी साडे पाच हजार रुपये प्रति क्विंटलला भाव मिळत आहे. शेतकरय़ांच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे.
- ललितभाई शहा, सभापती,
लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समिती, लातूर


इतर अॅग्रोमनी
दुसऱ्या लाटेचा बासमती तांदळास फटका कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बासमती...
महाराष्ट्राला साखर वाहतूक अनुदान...कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना...
इंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर...कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांत देशातून निर्यात...
देशाची साखर उत्पादनात उच्चांकी झेप कोल्हापूर ः साखर उत्पादनात देशाची घोडदौड ३०० लाख...
साखर निर्यातीचा ‘गोडवा’ वाढलाकोल्हापूर : केंद्राकडून साखर निर्यात धोरण जाहीर...
पाम तेल आयातीवर श्रीलंकेचा ‘सर्जिकल...कोलंबो : श्रीलंका सरकारने पाम तेलाच्या आयातीवर...
सोयाबीनची तेजी अबाधित पुणे ः यंदा सोयाबीच्या दरांमध्ये झालेली सुधारणा...
भारताकडून पिवळ्या वाटाण्याची आयात बंद पुणे ः युक्रेनमधून पिवळ्या वाटाण्याची आयात करणारा...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः यंदाचा बेदाणानिर्मितीचा हंगाम अंतिम...
हरभरा दरवाढीचे संकेतपुणे ः देशातील महत्त्वाच्या हरभरा उत्पादक...
कापूस लागवडीत यंदा घट शक्यपुणे ः पुढील दोन ते तीन महिन्यांत खरीप लागवड सुरू...
भारताने आयात-निर्यात धोरणांत बदल करू नयेपुणे ः केंद्र सरकारकडून आयात-निर्यातीच्या...
ब्राझीलच्या साखरेचा आंतरराष्ट्रीय...कोल्हापूर : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत...
खाद्य तेलाच्या किमती आटोक्यात आणणार :...नवी दिल्ली : देशातील खाद्य तेलाच्या किरकोळ...
अन्नप्रक्रिया उद्योगासाठी १०,९००...नवी दिल्ली : देशातील अन्नप्रक्रिया उद्योगासाठी (...
सांगली बाजारात हळदीचे दर स्थिर सांगली ः गेल्या आठवड्यापासून हळदीचे दर स्थिर असून...
चीनच्या मागणीने शेंगदाणा दराला आधार पुणे : शेंगदाण्याची बाजारात गेल्या वर्षीच्या...
राज्यात शिल्लक साखरेचा बोजा कायम कोल्हापूर : यंदाचा साखर हंगाम अंतिम टप्प्यात येत...
लातूरला सोयाबीनचा भाव साडे पाच हजारावरलातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
हळदीच्या आवकेत वाढसांगली ः हळदीचा हंगाम सुरु झाल्यापासून सहा ते...