agriculture news in marathi Soyabean productivity increase program will be implemented in Jalna district | Page 2 ||| Agrowon

सोयाबीन उत्पादकता वाढीसाठी प्रकल्प राबविणार; वेबिनारमध्ये निर्धार

ॲग्रोवन वृत्तसेवा
शनिवार, 17 एप्रिल 2021

जन जागृती प्रतिष्ठान, औरंगाबाद तर्फे शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या खास वेबिनारमध्ये सोयाबीन उत्पादकता वाढीसाठी प्रकल्प राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. 

औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील आडगाव (भोंबे) येथील रोकडोबा ऍग्रीटेक फार्मर प्रोड्युसर कंपनी लि.च्या माध्यमातून ७०० एकरवर खास सोयाबीन उत्पादनवाढीचा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. जन जागृती प्रतिष्ठान, औरंगाबाद तर्फे शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या खास वेबिनार मालिकेत मंगळवारी (ता. १३)घेण्यात आलेल्या मालिकेतील वेबिनारमध्ये याबाबत निर्धार व्यक्त करण्यात आला. 

या वेबिनारमध्ये राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, औरंगाबादचे सहयोगी संचालक, संशोधन, डॉ. सूर्यकांत पवार यांनी सोयाबीनची उत्पादकता कमी येणे याला हलक्या जमिनीत सोयाबीन घेणे, बियाण्याची उगवण शक्ती न पाहणे, शिफारशी प्रमाणात खते न देणे,  या मुख्य बाबीं कारणीभूत असल्याचा प्रकर्षाने उल्लेख केला.

डॉ पवार म्हणाले, की प्रथम जमिनीची आडवी उभी नांगरट, शक्यतोवर घरचेच बियाणे उगवणशक्ती तपासून वापरणे, योग्य जातीची निवड, एकरी २६ किलो बियाण्याचा वापर, पेरणीसाठी बीबीएफ पद्धतीचा अवलंब, बीज प्रक्रिया, शिफारशीनुसार खताचे योग्य नियोजन, पीकसंरक्षण या बाबी आधुनिक पद्धतीने वापरल्यास सोयाबीनचे भरघोस उत्पादन घेणे अवघड नाही. भारतात सोयाबीन उत्पादकता हेक्टरी १३ क्विंटल इतकी कमी आहे. आपणही हेच उत्पादन ३५ ते ४० क्विंटलपर्यंत घेऊ शकतो. 

डॉ. भगवानराव कापसे म्हणाले, डॉ. पवार यांनी सांगितलेल्या सर्व आधुनिक पद्धतीचा वापर रोकडोबा ऍग्रीटेक फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. आडगाव (भोंबे) व वाशीम कृषी विकास फार्मर प्रोड्युसर कंपनी ली., वाशीमच्या प्रकल्पात करण्यात येईल. तसेच खरिपात सोयाबीन तर रब्बीत डॉ. जडे यांचे तंत्रज्ञानाने एकरी १०० क्विंटल मका असा संयुक्त प्रकल्प राबविण्याचा मानस व्यक्त केला. त्यास रोकडोबा ऍग्रीटेक फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. चे अध्यक्ष प्रदीप अडगावकर यांनी सहमती दर्शविली. त्यासाठी डॉ. पवार यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करावे अशी विनंती केली. 

सटाण्याचे रामदास पाटील यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रयोगशाळेमध्ये शेतकऱ्यांना खास कमी किमतीत माती तपासून देणे व खताची मात्रा शिफारशीत करण्याची माहिती दिली. वाशीम जिल्ह्यातील वाशीम कृषी व विकास फार्मर प्रोड्युसर कंपनी ली.वाशीमचे अध्यक्ष  बद्री इढोळे यांनी हाच प्रकल्प आपल्या भागात सुद्धा तीनशे ते चारशे एकरवर राबविण्याचा मानस व्यक्त केला. या सर्व प्रकल्पास सर्वतोपरीने तांत्रिक मार्गदर्शन करण्याचे डॉ.पवार यांनी मान्य केले. 

प्रास्ताविक विकास कापसे यांनी केले, आभार जनजागृती प्रतिष्ठानचे सहाय्यक व्यवस्थापक रविराज खिलारी यांनी केले. कार्यक्रमास प्रदीप आडगावकर, संदीप भोंबे, राजू पांडव, अशोक सूर्यवंशी, शिवाजी उगले आदी शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.


इतर ताज्या घडामोडी
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...
धान चुकाऱ्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक...गोंदिया : गेल्यावर्षी आधारभूत दराने धान विक्री...
सांगलीत खरिपासाठी हवे ३३ हजार ६९०...सांगली  : यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कृषी...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
तुलनेत यंदा दुपटीने गाळपकोल्हापूर : गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, कांदा, फळ...जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीत...
अस्वलाकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी...भंडारा : जंगलालगत असलेल्या शेतीत वन्यप्राण्यांचा...
अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, ‘...मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर...
अति उष्ण, ढगाळ हवामानआठवडा अखेरपर्यंत ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील...
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे...पुणे ः बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड...
नाशिक : माथाडी युनियनकडून ‘काम बंद’नाशिक : राज्य शासनाच्या विविध माथाडी मंडळातील...
पुणे ‘जि.प.’तर्फे कर्मचाऱ्यांना मिळणार...पुणे ः ‘‘जिल्हा परिषदेच्या बक्षिस योजनेतून आता...
‘खरिपात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरा’सातारा : येत्या खरीप हंगामात  सोयाबीनचे...