agriculture news in marathi Soyabean rates again gains ten thousand mark | Page 3 ||| Agrowon

सोयाबीन दराची पुन्हा दहा हजारी; दर तेजीतच राहण्याची शक्यता

वृत्तसेवा
सोमवार, 6 सप्टेंबर 2021

ल्या सप्ताहात देशांतर्गत बाजारात दरात ५०० ते ७०० रुपयांची सुधारणा होऊन दर ९००० ते १०५०० रुपयांपर्यंत पोहोचले होते.

पुणे ः गेल्या सप्ताहात सोयाबीन दरात मोठी सुधारणा पाहायला मिळाली. पेरणीला विलंब झाल्याने आवक हंगामाला होणार उशीर आणि नगण्य साठा या पार्श्‍वभूमीवर सोयाबीनचे दर देशांतर्गत बाजारात वाढत आहेत. सोयापेंड आयातीचा बाजारावरील परिणाम कमी झाला आहे. गेल्या सप्ताहात देशांतर्गत बाजारात दरात ५०० ते ७०० रुपयांची सुधारणा होऊन दर ९००० ते १०५०० रुपयांपर्यंत पोहोचले होते.

सरकारने ऑगस्ट महिन्यात जनुकीय सुधारित सोयापेंड आयातीला परवानगी दिल्यानंतर सोयाबीन बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. मात्र देशांतर्गत बाजारातील तुटवडा आणि लांबलेला आवक हंगाम यामुळे दराने पुन्हा उसळी घेतली. एक ऑक्टोबरपासून सुरू होणार हंगाम यंदा किमान १५ दिवस दिवस लांबण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी अंदाजे २ ते ३ लाख टनांपर्यंत शिल्लक साठा राहत होता. यंदा मात्र नगण्य सोयाबीन शिल्लक असल्याचे बाजारातील जाणकार सांगतात. त्यामुळे स्टॅाकिस्ट साथ सांभाळूनच सोयाबीनची विक्री करत आहेत.

सोयाबीन प्रक्रियादार प्लांट्समध्ये मागणी सुरू झाली आहे. त्यातच मध्य प्रदेशात नगण्य आवक सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता पुढील आठवड्यात नवीन सोयाबीन तुरळक ठिकाणी बाजारात येण्याची शक्यता इंदूर येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मागील आठवड्यात जागतिक बाजारात सोयाबीन दरात तेजी-मंदीचे वातावरण होते. सट्टेबाजांच्या हजेरीने बाजारात उत्साह निर्माण झाला होता. त्यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीन दरात ५०० ते ७०० रुपयांनी सुधारणा झाल्याचे स्पष्ट झाले.

यामुळे दर तेजीतच राहण्याची शक्यता  

  • परवानगी मिळालेली सोयापेंड लगेच येण्याची शक्यता नाही
  • देशांतर्गत हंगाम किमान १५ दिवस उशिरा सुरू होणार
  • देशात शिल्लक सोयाबीन नगण्य
  • प्रक्रिया प्लांट सुरू करण्यासाठी मागणी
  • सट्टेबाज सक्रिय झाल्याची शक्यता

पुन्हा गाठली दहा हजारी
महिन्यात सरकारने १२ लाख टन जनुकीय सुधारित सोयापेंडच्या आयातीला परवानगी दिल्याने सोयाबीनचा कमाल दर आठ हजारांवर येऊन ठेवला होता. परंतु पुन्हा दर सुधारले असून राजस्थानमध्ये १०५०० रुपयांपर्यंत मजल मारली. गेल्या सप्ताहात सोयाबीन दरात ५०० ते ७०० रुपयांनी सुधारणा झाली. तर प्लांट दरात ८०० ते १५०० रुपयांपर्यंत दर वाढले. मागील आठवड्यात मध्य प्रदेशात ९२०० ते ९७०० रुपये दर होते. तर महाराष्ट्रात ९००० ते ९५०० रुपये आणि राजस्थानात ९७०० ते १०५०० रुपयांपर्यंत दर सोयाबीनला मिळाले.

 


इतर अॅग्रोमनी
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
खाद्यतेल आयात शुल्क  कपातीचा ग्राहकांना...पुणे : केंद्र सरकारने देशांतर्गत वाढत्या...
तूर, उडीद आयात कालावधी वाढविल्याचा होईल...पुणे : केंद्र सरकारने तूर आणि उडीद आयातीसाठीचा...
हळद निर्यात ऑगस्टमध्ये ११ टक्क्यांनी...पुणे : देशात निर्यातयोग्य हळदीचा साठा उपलब्ध आहे...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
केंद्राच्या निर्य़ातीनंतर सोयाबीनच्या...पुणे : केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात...
केंद्र सरकारकडून खाद्यतेल आयात शुल्कात...नवी दिल्ली ः देशात खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीवर...
वाढत्या मागणीने हरभरा दरात सुधारणापुणे : साठेबाज, व्यापारी आणि मिलर्सवर असलेली...
तूर, मूग, उडीद आयातीची प्रक्रिया सुरू;...पुणे : केंद्र सरकारने पंचवार्षिक करार करून...
रब्बीचे हमीभाव जाहीर : गव्हात ४०; हरभरा...नवी दिल्ली : केंद्र सरकारने रबी हंगामासाठी...
उडीद दरात सुधारणेची चिन्हेपुणे ः गेल्या हंगामात देशात उडदाचे उत्पादन कमी...
बेदाणा दरात प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांची...सांगली : अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यामुळे...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करावी...नागपूर : एफआरपीत वाढ झाली असतानाच साखरेच्या...
सोयाबीन दराची पुन्हा दहा हजारी; दर...पुणे ः गेल्या सप्ताहात सोयाबीन दरात मोठी सुधारणा...
कडधान्याचे गणित पावसावरच अवलंबूनमुंबई : देशात यंदा मॅान्सूनची सुरुवात चांगली झाली...
साखरदराचा वारू चौखूर उधळला; ३५०० चा...कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांपासून स्थानिक...
पंढरपुरात बेदाण्यास सर्वाधिक ३०५ रुपये...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोयापेंड आयात थांबवा : राज्य सरकारचे...पुणे : जनुकीय परावर्तित (जीएम) सोयाबीनपेंडच्या...