येडशीतील शेतकऱ्यांचे सोयाबीन मातीमोल

ईट परिसरात सलग आठ दिवसांपासून रोजच पाऊस येत आहे. त्यामुळे शेतातच सोयाबीन भिजत आहे. त्यामुळे उभ्या, काढलेल्या सोयाबीनला कोंब आले आहेत. परिणामी, हाती आलेले पीक वाया गेले आहे. - तुषार तिवारी, शेतकरी, निपाणी
येडशीतील शेतकऱ्यांचे सोयाबीन मातीमोल
येडशीतील शेतकऱ्यांचे सोयाबीन मातीमोल

येडशी, जि. उस्मानाबाद : येथील शेतशिवारात सोयाबीनचे पीक उत्तम आले. शेतकऱ्यांच्या चार पैसे हाती येतील, अशी स्थिती असताना पावसाने सोयाबीन मातीमोल झाले आहे. पिकांना जमिनीवरच अंकुर येत आहेत. पावसामुळे शेतातील उभ्या, काढलेल्या सोयाबीनला  कोंब फुटल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.

पेरणी केल्यानंतर अधून-मधून या पिकांवर वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. सोयाबीनच्या दाण्यामध्ये वाढ झाली. मात्र, काढणी मार्गावर असताना पावसाने सातत्याने हजेरी लावली. त्यामुळे पीक भिजल्याने सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. पांढऱ्या शुभ्र येणाऱ्‍या या पिकाला काळसर रूप आले आहे. आता त्याला बुरशी आली आहे. 

पावसाची रिपरिप गेल्या पाच सहा दिवसांपासून सुरू आहे. त्यापासून पिकाचा बचाव करण्यासाठी गंजीवर ताडपत्री ने झाकून ठेवण्याची लगबग दिसून आली. नुकसानीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. सातत्याने मागील तीन ते चार वर्षांपासून सोयाबीनच्या पिकाने दगा दिल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली. पेरणीपासून केलेला खर्चही वसूल न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या शेतीकामांची लगबग रोडावली आहे. 

ईट, डोकेवाडी, सोन्नेवाडी, अंजनसोंडा, गिरवली, आंद्रुड, लांजेश्वर, निपाणी, पखरुड, माळेवाडी, ज्योतिबाचीवाडी, गिरलगाव, घुलेवाडी, नागेवाडी, झेंडेवाडी, पांढरेवाडी या परिसरात रोजच पाऊस पडत आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना सर्वाधिक झळ बसली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com