नागपुरात सोयाबीन ३७०० रुपये

सोयाबीन
सोयाबीन

नागपूर ः सोयाबीनचे दर चार हजारांवर पोचतील, अशी अपेक्षा असताना गेल्या पंधरवड्यापासून दर ३२०० ते ३७०० रुपयांवर स्थिरावले आहेत. सोयाबीनची रोजची सरासरी ४०० क्‍विंटलच्या आसपास आवक आहे, अशी माहिती कळमणा बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  धनियाची आवक अवघी २ क्‍विंटलची असून, दर ४६०० ते ४८०० रुपये दर आहे. मूग ४२०० ते ४६०० रुपये क्‍विंटल असून आवक जेमतेम ३ क्‍विंटल आहे. तुरीची १५०० ते २००० क्‍विंटलच्या घरात आवक असून, गेल्या आठवड्यात असलेल्या ४४०० रुपयांवरून घसरण होत ३६०० ते ४०६८ रुपये दर आहेत. हरभरा दर गेल्या आठवड्यात ३३०० ते ४०४२ रुपये प्रतिक्‍विंटल होते. त्यात घसरण होत हे दर ३१०० ते ३४२५ रुपयांपर्यंत खाली आले. ज्वारीची आवक ३ ते ४ क्‍विंटलच्या होत असून, दर १८०० ते २२०० रुपये क्‍विंटलवर पोचले. सरबती गव्हाची आवक ३० ते ३२ क्‍विंटल आणि दर २२०० ते २७०० रुपये क्‍विंटल असे स्थिर आहेत. लुचई तांदूळदेखील २२०० ते २४०० रुपये क्‍विंटलवर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मोठ्या आकाराच्या संत्रा फळांचे दर २० फेब्रुवारी २५०० ते ३००० रुपये क्‍विंटल होते. १ मार्चनंतर हे दर २५०० ते ३२०० रुपये क्‍विंटलवर स्थिरावले. मोसंबीच्या मोठ्या आकारांच्या फळांची सरासरी ५०० क्‍विंटलची रोजची आवक आहे. मोसंबी सुरवातीला २५०० ते २९०० रुपये प्रती क्‍विंटल होती. त्यात वाढ होत हे दर आता २६०० ते ३३०० रुपये क्‍विंटलवर पोचले आहेत.  लाल कांदा सुरवातीला १८०० ते २३०० रुपये क्‍विंटल होता. १० हजार क्‍विंटलची कांदा आवक बाजारात होत होती. कांदा आवक ४००० क्‍विंटलवर तर दर १२०० ते १५०० रुपये क्‍विंटलवर आले. पांढरा कांदा १३०० ते १८०० रुपये क्‍विंटल होता. ८०० ते ९०० रुपयांपर्यंत पांढऱ्या कांद्याचे दर खाली आले आहेत. बाजरात लसूनाची देखील आवक होत असून १००० ते २५०० रुपये प्रती क्‍विंटलचा दर लसूनाला होता. हे दर आता ६०० ते १२०० रुपये क्‍विंटलपर्यंत खाली आले आहेत. आल्याचे दर २२०० ते २४०० रुपये क्‍विंटल आणि आवक ९३३ क्‍विंटलची आहे. टोमॅटोचे व्यवहार ७०० ते ८०० रुपये क्‍विंटलने होत आहेत. टोमॅटोची आवक ४०० ते ४५० क्‍विंटलची आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com