agriculture news in Marathi soybean and cotton producers not given crop insurance Maharashtra | Agrowon

कापूस, सोयाबीन उत्पादक विमा कंपन्यांकडून वाऱ्यावर 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जून 2020

धान उत्पादक ३४ हजार शेतकऱ्यांना सुमारे १३ कोटी ७१ लाख रुपयांची भरपाई पीकविमा कंपन्यांकडून देण्यात आली.

गडचिरोली: धान उत्पादक ३४ हजार शेतकऱ्यांना सुमारे १३ कोटी ७१ लाख रुपयांची भरपाई पीकविमा कंपन्यांकडून देण्यात आली. मात्र त्याचवेळी कापूस व सोयाबीन उत्पादकांना मात्र वाऱ्यावर सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्‍त होत आहे. 

नक्षलप्रवण आदिवासीबहूल आणि दुर्गम अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात धान लागवड क्षेत्र सर्वाधीक आहे. नजीकच्या काळात नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीन, कापूस यासारख्या पिकाकडे देखील वळले आहेत. नैसर्गिक संकटातून सावरता यावे याकरीता शेतकऱ्यांव्दारे या पिकांना विमा संरक्षण दिले जाते. त्यासाठी ठरावीक विमा हप्ताही भरण्यात येतो. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई यातून होईल, अशी अपेक्षा त्यांना असते. 

परंतु गेल्या हंगामात या भागातील शेतकऱ्यांना धानाचे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात आली. त्याचवेळी कापूस, सोयाबीन घेणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र भरपाईपासून डावलण्यात आले. गेल्यावर्षी पीकविम्याबाबत जागृती करण्यात आल्याने शेतकऱ्यांचा या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला. २०१९ मध्ये १ हजार ६२ हेक्‍टर क्षेत्रावरील कापूस पिकाचा विमा काढण्यात आला. सोयाबीनचा १०९ हेक्‍टर तर धान पिकाचा सर्वाधीक २८ हजार ३२४ हेक्‍टर क्षेत्राचा विमा काढण्यात आला. विमा हप्ता म्हणून ५ कोटी ५५ लाख रुपयांचा भरणा केला. 

गेल्यावर्षी सर्वाधीक पाऊस झाला. खोलगट भागातील जमिनीत तसेच नदी, नाल्यांच्या काठावर असलेल्या जमिनीत पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर विमा कंपन्यांनी ३४ हजार ६४७ शेतकऱ्यांना १३ कोटी ७१ लाख रुपयांचा विमा दावा मंजूर केला आहे. 

पीक विमा योजनेची स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये) (भरपाई रुपयात) 

पीक शेतकरी संरक्षित क्षेत्र लाभधारक भरपाई 
कापूस १०३९ १०६२.८५ शून्य शून्य 
धान ३५,११० २८३२४.४७ ३४६४७ १३७१.३ 
सोयाबीन ८८ १०९.१ शून्य शून्य 

 


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया... नगर   ः जोमात असलेल्या खरीप...
सोलापुरात खते उपलब्धता पुरेशी, दरवाढीचा...सोलापूर   ः सोलापूर जिल्ह्यात जूनअखेर...
जळगावात आले २८०० ते ४४०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारा जिल्ह्यात जाणवतेय युरियाची टंचाई सातारा   ः खरीप हंगामाकरिता रासायनिक...
पुणे जिल्ह्यात अनावश्यक खते खरेदी ...पुणे  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामात खतांची...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील पाच मंडळांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना...
जळगाव जिल्ह्यात टंचाईमुळे जादा दराने...जळगाव : जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेत झाली, पण...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आदी...
बीड विभागात १८ लाख क्विंटल कापसाची खरेदीबीड  ः राज्य कापूस पणन महासंघाच्या बीड...
महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला `आयएसओ...सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील...
नांदेड, परभणी, हिंगोलीत खतांसाठी...नांदेड : यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनी...
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची धावपळ,...नाशिक : खरीप पिकांना वाढीच्या अवस्थेत खतांची...
पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१...परभणी : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
महाराष्ट्राच्या विकासात डॉ. चव्हाण...मुंबई : जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा...
सोलापूरसह नजीकच्या गावांमध्ये ...सोलापूर  : सोलापूर शहर आणि शेजारील...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या...नाशिक : खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी...
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया...नगर ः जोमात असलेल्या खरीप पिकांसाठी युरियाची...
शेतकऱ्याने तुटपुंज्या मदतीचा धनादेश...नाशिक : निसर्ग चक्री वादळाने ३ जून रोजी येवला...
अकोला : आवश्‍यक खते मिळवताना...अकोला ः या हंगामातील पिकांची लागवड होऊन बहुतांश...
सिंधुदुर्गात खते मिळाली; पण वेळेत नाहीतसिंधुदुर्ग ः खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात...