Agriculture news in Marathi Soybean area likely to increase in Nanded | Agrowon

नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 जून 2021

जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर सोयाबीनचे क्षेत्र प्रस्तावित आहे. परंतु यात आणखी वाढ होऊन कपाशीचे क्षेत्र तीस ते चाळी टक्क्यांनी घटण्याची शक्यता कृषी विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. 

नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर सोयाबीनचे क्षेत्र प्रस्तावित आहे. परंतु यात आणखी वाढ होऊन कपाशीचे क्षेत्र तीस ते चाळी टक्क्यांनी घटण्याची शक्यता कृषी विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. 

खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात वाढ होऊन तब्बल चार लाख क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी कृषी विभागाने प्रस्तावित केली आहे. तर कपाशीच्या क्षेत्रात यंदा दोन लाख साठ हजार हेक्टरवरून २ लाख ३० हजार हेक्टरवर लागवड होईल, अशी शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली होती. परंतु प्रत्यक्षात मात्र यात मोठी घट दिसून येत आहे. जिल्ह्यातील सर्वच भागांतील शेतकऱ्यांनी बियाणांची खरेदी केली आहे. या खरेदीवरून कृषी विक्रेत्यांना शेतकऱ्यांनी कपाशी पिकाकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. अनेक भागांत कपाशीच्या पाकिटांची विक्री तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत घटल्याचे दिसून आले आहे. यामुळे आगामी काळात जिल्ह्यात पुन्हा एकदा सोयाबीनच्या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ 
मागील पाच वर्षांच्या सरासरी पेरणी क्षेत्राच्या तुलनेत यंदा खरीप हंगामात सोयाबीनच्या पेऱ्यात तब्बल ९० हजार हेक्टरने वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली होती. तर कपाशी मात्र दोन लाख साठ हजार हेक्टरवरून २ लाख ३० हजार हेक्टरवर लागवड होईल, असे वर्तविण्यात आले होते. परंतु कपाशीच्या लागवडीत यापेक्षाही अधिक घट होइल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

बाजारात यंदा कपाशी पाकिटाच्या विक्रीमध्ये घट दिसून आल्याने जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता आहे.
- दिवाकर वैद्य, बियाणे विक्रेता, नवा मोंढा नांदेड


इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय शेतीचे तंत्र अंगीकारा ः डॉ. ढवणबदनापूर, जि. जालना : अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित...
पंतप्रधान आवास योजनेसाठी ११ लाख नावे...नगर ः ग्रामीण भागातील गरीब, अल्पभूधारक, घर...
अमरावती : निकृष्ट बियाणेप्रकरणी भरपाईचे...अमरावती ः निकृष्ट बियाण्यासंदर्भाने तालुकास्तरीय...
सात-बारासह फेरफारही मिळणार आता ऑनलाइन...पुणे : शेती संबंधीच्या दस्ताऐवजांची संगणकीकृत...
सांगली : पूरबाधितांच्या पंचनाम्यांचा...सांगली : महापुरानंतर आता नुकसानीचे पंचनामे सुरू...
अतिवृष्टीने नुकसान; ३४ हजारांवर अर्जअकोला : गेल्या महिन्यात जिल्ह्यात तीन दिवस...
जमीन अधिग्रहणाला विरोध; आळेफाट्यावर...आळेफाटा, जि. पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड...
नगरमध्ये मिळाला पीकविमा; श्रेयासाठी...नगर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या...
पदविकाधारकांना खासगी पशुवैद्यकीय...अकोला : दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन...
राळेगावमध्ये कपाशीवर बोंडअळीचा...राळेगाव, जि. यवतमाळ : जिल्ह्याचे मुख्य पीक...
परभणीत ४४६ कोटी ५९ लाख रुपये वितरणपरभणी ः चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) जुलै...
अनेक नोंदणीधारक शेतकरी ज्वारी...भालेर, जि. नंदुरबार ः जिल्ह्यात शुक्रवार (ता. ३०...
डाळ व्यापाऱ्याची चार कोटींनी फसवणूक नागपूर : डाळ व्यापाऱ्याला आमिष दाखवून साखरेच्या...
महसूली प्रकरणांचा निपटारा तीन टप्प्यांत...नाशिक : सेवाहक्कांतर्गत १००पेक्षा अधिक व राज्यात...
उजनीतून खरिपासाठी पहिले आवर्तन सोडणारसोलापूर ः उजनी धरणात आतापर्यंत उपयुक्त पाणीसाठा...
नागपुरात सोयाबीन दरातील घोडदौड कायम नागपूर ः प्रक्रिया उद्योजकांची मागणी वाढल्याने...
कृषी सल्ला : दापोली विभागपावसाच्या पाण्यामुळे फवारणी केलेले कीटकनाशक किंवा...
नगरला वाटाणा, भेंडीच्या दरात सुधारणा;...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
नाशिकमध्ये डाळिंबाच्या आवकेत वाढनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पावसाच्या उघडिपीमुळे भाजीपाला आवकेत वाढपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...