Agriculture news in Marathi Soybean area likely to increase in Nanded | Page 4 ||| Agrowon

नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 जून 2021

जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर सोयाबीनचे क्षेत्र प्रस्तावित आहे. परंतु यात आणखी वाढ होऊन कपाशीचे क्षेत्र तीस ते चाळी टक्क्यांनी घटण्याची शक्यता कृषी विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. 

नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर सोयाबीनचे क्षेत्र प्रस्तावित आहे. परंतु यात आणखी वाढ होऊन कपाशीचे क्षेत्र तीस ते चाळी टक्क्यांनी घटण्याची शक्यता कृषी विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. 

खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात वाढ होऊन तब्बल चार लाख क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी कृषी विभागाने प्रस्तावित केली आहे. तर कपाशीच्या क्षेत्रात यंदा दोन लाख साठ हजार हेक्टरवरून २ लाख ३० हजार हेक्टरवर लागवड होईल, अशी शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली होती. परंतु प्रत्यक्षात मात्र यात मोठी घट दिसून येत आहे. जिल्ह्यातील सर्वच भागांतील शेतकऱ्यांनी बियाणांची खरेदी केली आहे. या खरेदीवरून कृषी विक्रेत्यांना शेतकऱ्यांनी कपाशी पिकाकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. अनेक भागांत कपाशीच्या पाकिटांची विक्री तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत घटल्याचे दिसून आले आहे. यामुळे आगामी काळात जिल्ह्यात पुन्हा एकदा सोयाबीनच्या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ 
मागील पाच वर्षांच्या सरासरी पेरणी क्षेत्राच्या तुलनेत यंदा खरीप हंगामात सोयाबीनच्या पेऱ्यात तब्बल ९० हजार हेक्टरने वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली होती. तर कपाशी मात्र दोन लाख साठ हजार हेक्टरवरून २ लाख ३० हजार हेक्टरवर लागवड होईल, असे वर्तविण्यात आले होते. परंतु कपाशीच्या लागवडीत यापेक्षाही अधिक घट होइल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

बाजारात यंदा कपाशी पाकिटाच्या विक्रीमध्ये घट दिसून आल्याने जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता आहे.
- दिवाकर वैद्य, बियाणे विक्रेता, नवा मोंढा नांदेड


इतर बातम्या
जायकवाडीतील उपयुक्‍त पाणीसाठा ७१.३९ टक्...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी...
नांदेडमधील प्रकल्पांत ८२.५७ टक्के...नांदेड : ऑगष्ट-सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला...
नंदुरबार जिल्ह्यात चार साखर कारखाने...जळगाव : खानदेशात उसाची लागवडदेखील बऱ्यापैकी आहे....
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास...सोलापूर ः ‘‘कृषी योजनांचा अधिकाधिक प्रसार करून...
‘‘हतनूर’मधून ३८८ दशलक्ष घनमीटर पाणी...जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९०...
खानदेशात अतिपावसाचा कांदा पिकाला मोठा...जळगाव : खानदेशात अतिपावसाने कांदा पिकाची अतोनात...
हिंगोलीत पीकविम्याच्या प्रतीक्षेत २६...हिंगोली ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत राज्य...
नांदेड जिल्ह्यात साडेचार लाख...नांदेड : जिल्ह्यात महसूल विभागातर्फे दोन आक्टोबर...
मध केंद्र योजनेंतर्गत साहित्य  स्वरूपात...नाशिक : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग...
रत्नागिरीत तीन हजार हेक्टर भात क्षेत्र...रत्नागिरी ः जिल्ह्यात दरवर्षी ६७ हजार ५००...
धामणटेक येथे ‘पीएमआरडीए’च्या विकास...राजगुरूनगर, जि. पुणे : पुणे महानगर प्रादेशिक...
ठिबक अनुदान वाटपाच्या  प्रक्रियेवर...पुणे : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून अनुदान...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान...
खानदेशात अतिपावसाने  कापूस पीकस्थिती...जळगाव : खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकाची स्थिती...
खाद्यतेल आयात शुल्क  कपातीचा ग्राहकांना...पुणे : केंद्र सरकारने देशांतर्गत वाढत्या...
सौरकृषी पंपाच्या  कुसुम योजनेला अखेर...पुणे : उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे गेली...
पीक नुकसान तक्रारीसाठी धडपड औरंगाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
जुलैतील नुकसानीपोटी अकोल्याला ५४ कोटीअकोलाः जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत शेती व...
खानदेशात ई पीक पाहणीला शेतकऱ्यांचा कमी...जळगाव : खानदेशातील सुमारे तीन हजार पाडे, महसुली...
उजनी परिसरात सोयाबीनवर `यलो मोझॅक’ उजनी, जि. लातूर : खरीप हंगामातील प्रमुख सोयाबीन...