Agriculture news in Marathi Soybean area in Madhya Pradesh is projected to decline | Page 2 ||| Agrowon

मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी होण्याचा अंदाज

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 जून 2021

मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनच्या लागवडीत यंदा बियाणे तुटवड्यामुळे अडचण निर्माण झाली आहे.

नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनच्या लागवडीत यंदा बियाणे तुटवड्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. राज्यात नऊ हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटल या दराने सोयाबीन बियाण्याची विक्री होत असून त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. या कारणामुळे मध्य प्रदेशात या वर्षी सोयाबीन खालील क्षेत्र कमी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

देशातील सर्वाधिक सोयाबीन उत्पादक राज्य म्हणून मध्य प्रदेशची ओळख आहे. मात्र, यावर्षी राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे टंचाईचा सामना करावा लागत आहे. परिणामी मध्यप्रदेशचे कृषिमंत्री कमल पटेल यांनी शेतकऱ्यांनी सोयाबीन वगळता इतर पिकांकडे वळण्याचा सल्ला दिला आहे. 

मध्य प्रदेशमध्ये गेल्या हंगामात ५८ लाख हेक्‍टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. या वर्षी हे क्षेत्र ६३ लाख ७४ हजार हेक्‍टरपर्यंत राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. राज्यात बियाणे बदल दर ३२ टक्के आहे. त्यानुसार २० लाख हेक्टरवरील पेरणीसाठी बियाणे लागणार आहे. याचा अंदाज घेतल्यास तब्बल १६ लाख क्विंटल बियाण्याची गरज राज्याला आहे. मात्र, राज्यात तुटवड्याआड १०,००० ते १२,००० रुपये क्विंटल दराने बियाणे विकल्या जात आहे. 

या महागड्या बियाण्याच्या दर्जाबाबत देखील शेतकरी साशंक आहेत. त्यातच या वर्षी पावसाने उघडीप दिल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येणार आहे. अशा वेळी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च दुपटीने वाढणार असला तरी त्याची भरपाई होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जाते. अशा संकटातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी आधीच सोयाबीन क्षेत्र कमी करून इतर पिकांकडे वळण्याचा सल्ला मध्यप्रदेशची कृषिमंत्री कमल पटेल यांनी दिला आहे. 

चीनकडून वाढली आयात
या वर्षातील पाच महिन्यांच्या कालावधीत (जानेवारी ते मार्च) चीनने ३८२.३ लाख टन सोयाबीन आयात केले आहे. जे मागील वर्षाच्या तुलनेत ४४ टक्के अधिक आहे. 

उत्पादकता खर्चाची होणार नाही भरपाई
यावर्षी केंद्र सरकारने सोयाबीनचे हमीभावात ७० रुपयांची वाढ केली आहे. या वर्षी ३९५० रुपये प्रतिक्विंटल दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र, एक हेक्टर क्षेत्राचा उत्पादन खर्च काढल्यास त्यामध्ये ५ हजार रुपयाचे बियाणे, ५०० ते ७०० रुपयांचा युरिया, कल्टीवेटर १५०० रुपये, कीडनाशक १५०० रुपये, मजुरी १००० कापणी १२०० ते १५०० त्यानुसार दहा हजार पाचशे रुपये खर्च होणार आहे. 

जीएम बियाण्यासाठी तेलदरात वाढ
देशात सध्या ४० टक्के खाद्यतेलाची आयात केली जाते. भारतात २३ ते २४ दशलक्ष टन खाद्य तेलाचा वापर आहे. उत्पादन अवघे नऊ दशलक्ष टन आहे. १५ दशलक्ष टन खाद्य तेलाची आयात केली जाते. मात्र, त्यानंतरही मध्य प्रदेशच्या कृषिमंत्र्यांनी तेलवर्गीय सोयाबीन खालील क्षेत्र कमी करून इतर पिकाकडे वळण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे, अशी स्थिती राहिल्यास देशात तेलाचे दर वाढते राहतील. हा जीएम बियाण्याचे समर्थन करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा रंगली आहे. मध्य प्रदेशमध्ये यावर्षी ६० हजार हेक्‍टरवर सोयाबीन लागवड होण्याची शक्यता आहे. या तुलनेत महाराष्ट्रात सोयाबीन खालील क्षेत्र ४३ लाख हेक्टरपर्यंत राहते. देशांतर्गत एकूण लागवडीच्या ८९ टक्के क्षेत्र एकट्या मध्य प्रदेशमध्ये आहे.

देशात आणि मध्यप्रदेश मध्ये सोयाबीन खालील क्षेत्र कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ती निव्वळ अफवा आहे. शेतकऱ्यांकडे घरचे बियाणे आहे. याचाच वापर या हंगामात केला जाईल. त्यामुळे क्षेत्र कमी होणार नाही.
- डी. एन. पाठक, कार्यकारी संचालक, 
सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडिया (सोपा)


इतर बातम्या
मॉन्सूनचा महाराष्ट्रातून निरोपपुणे : राजस्थानातून परतीच्या प्रवासाला उशिरा...
रब्बीसाठी बियाणे पुरवठादार म्हणून...अकोला ः येत्या रब्बी हंगामात राष्ट्रीय अन्न...
खाद्यतेल आयातशुल्कात मोठी कपातपुणे : काही केल्या खाद्यतेलाचे दर कमी होत नाही...
अतिवृष्टिग्रस्तांसाठी १० हजार कोटीमुंबई ः राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे...
पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत  सर्वोच्च...मुंबई : पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत सर्वोच्च...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
उत्तर प्रदेशातील घटनेसाठी बंद पाळला; ...अकोला : लखीमपूर खिरी येथील शेतकऱ्यांच्या न्याय...
केंद्राने शेतकरीविरोधी निर्णय मागे...उजनी. जि. लातूर: केंद्र सरकारने केलेल्या कृषी...
‘सीसीआय’ करणार खुल्या बाजारातून कापूस...नागपूर ः आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा परिणामी...
गृहराज्यमंत्री मिश्रांनी राजीनामा...मुंबई : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर येथील घटनेचे...
`रामकृष्ण उपसा सिंचन योजना सुरू करा`महालगाव, जि. औरंगाबाद : रामकृष्ण उपसा सिंचन योजना...
एकरकमी ‘एफआरपी’ देणे कारखान्यांना नाही...माळीनगर, जि. सोलापूर ः ‘‘साखरेची विक्री वेळेत होत...
कापूस पिकात व्यवस्थापन केल्यास उत्पादन...वाकोद, जि. जळगाव  : ‘‘कापूस उत्पादक...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन काढणीमुळे...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सोयाबीन...
हंगाम जोरावर, मजूर मिळेनातनांदुरा, जि. बुलडाणा : तालुक्यातील सध्या सोयाबीन...
मराठवाड्यात नुकसान बाधित क्षेत्र ३५...औरंगाबाद : मराठवाड्यात हाहाकार माजविणाऱ्या...
`फळबाग आंबिया बहरासाठी ऑनलाइन अर्ज...नाशिक : ‘‘राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित...
शेतकऱ्यांची कर्जवसुली दहा वर्षे थांबवासांगली : शेतकऱ्यांची कर्जवसुली दहा वर्षांपर्यंत...
दोन खत विक्रेत्यांचे परवाने निलंबितपुणे : पॉस मशिन आणि गोदामातीळ प्रत्यक्ष साठा न...
ताकारी योजना सुरू;  ओढे-नाले कोरडे... वांगी, जि. सांगली : ताकारी योजना सुरू होऊन...