कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दर स्थिर

सोयाबीनची आवक आणि दर स्थिर
सोयाबीनची आवक आणि दर स्थिर

नागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत शेतीमालाची आवक मर्यादित आहे. सोयाबीनची आवक २०० क्‍विंटलची असून, दर ३५०० गेल्या आठवड्यापासून ३५०० रुपये क्‍विंटलवर स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सोयाबीनची गेल्या आठवड्यातील आवक २५३ क्‍विंटलची होती. ३००० ते ३५९१ रुपये क्‍विंटलपर्यंत दर पाचेले होते. या आठवड्यात सोयाबीन दर ३२५० ते ३५१५ रुपये क्‍विंटलवर आहेत. तुरीचे दर गेल्या आठवड्यात ४९०० ते ५५०० रुपये क्‍विंटल होते. या आठवड्यात हे दर ४८०० ते ५५६५ रुपये क्‍विंटलवर पोचल्याची माहिती देण्यात आली. तूरीची आवक जेमतेम ५० ते ६० क्‍विंटल इतकीच आहे. तुरीच्या दरात चढ-उतार होत राहतील, असेही सांगण्यात आले. 

बाजारात मुगाला ५००० ते ५२०० रुपये क्‍विंटलचे दर मिळाले. मुगाची आवक २६ ते २८ क्‍विंटलची आहे. हरभऱ्याची बाजारात नियमित आवक होत असून, ती सरासरी ५०० क्‍विंटलच्या घरात आहे. ३८०० ते ४१०२ रुपये क्‍विंटलचा दर हरभऱ्याला होता. त्यात काहीशी सुधारणा होत. दर ३९०० ते ४१३४ रुपये क्‍विंटलवर पोचले. 

बाजारात मोठ्या आकाराची मोसंबी फळांची सरासरी १०० क्‍विंटलची आवक आहे. मोसंबीचे दर  ४५०० ते ५००० रुपये क्‍विंटल प्रमाणे होते. केळीची आवक ४०० क्‍विंटलची, तर दर ४५० ते ५०० रुपये क्‍विंटलवर गेल्या पंधरवाड्यापासून स्थिर आहेत. द्राक्षाची अवघी एक क्‍विंटलची आवक बाजारात होत आहे. द्राक्षाचे दर ३५०० ते ४५०० रुपये क्‍विंटलवरून घसरत ३००० ते ४००० रुपये क्‍विंटलवर आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com