agriculture news in Marathi soybean auction without artiyas Maharashtra | Agrowon

राहात्यात अडत्यांना टाळून सोयाबीनचे लिलाव  

टीम अॅग्रोवन
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून राहाता (जि. नगर) बाजार समितीत अडत्यांना टाळून शुक्रवारी (ता. ९) सोयाबीनचे लिलाव झाले. 

नगर ः माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून राहाता (जि. नगर) बाजार समितीत अडत्यांना टाळून शुक्रवारी (ता. ९) सोयाबीनचे लिलाव झाले. त्यामुळे प्रती क्विंटलमागे शंभर रुपये दर वाढही मिळाली. खरेदीदार व्यापाऱ्यांनीही या उपक्रमाला प्रतिसाद दिला. थेट लिलावात प्रती क्विंटल साधारण ३८०० रुपये दर मिळाला तर चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला ३ हजार ९५५ रुपयांचा दर मिळाला असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.  

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी पूर्वी त्यांच्या ओळखीच्या अडत्याच्या गाळ्यात शेतमाल उतरवत. नंतर व्यापारी गाळ्याजवळ जाऊन त्याचा लिलाव करीत. त्यात बऱ्याचदा अडत्याला हस्तक्षेपाची संधी मिळे. त्याचा हस्तक्षेप टाळून थेट शेतमालाचा लिलाव करण्याची सूचना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. त्यानुसार त्याला शुक्रवारी प्रारंभ झाला आणि अडत्यांना टाळून शेतकऱ्यांच्या वाहनांजवळ जाऊन शेतमालाचा लिलाव करण्याची नवी पद्धत सुरु केली. 

व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्यानंतर अडत्यांनीही त्यांची भूमिका बदलली आणि तेही व्यापाऱ्यांसारखे खुल्या लिलावात खरेदीसाठी सहभागी झाले. तुलनेत अधिक दर मिळाल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला. पोत्यामागे १०० रुपयांनी दर वाढल्याने गावोगावी वजनकाटे मांडून खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही अधिक भाव देण्याची वेळ आली.

सरासरी ३८०० रुपये दर
मक्तेदारी कमी झाली आणि खुली स्पर्धा झाली, तर शेतमालाला अधिक भाव मिळण्याची शक्‍यता वाढते, असे पहिल्यांदाच बाजार समितीत दिसले. अडत्यांचे दडपण व हस्तक्षेप नसल्याने, सोयाबीनला सरासरी प्रतिक्विंटल ३८०० रुपये भाव मिळाला. दिवसभरात ५०० हून अधिक पोत्यांची आवक झाली. उत्तम प्रतीचे सोयाबीन ३९५५ रुपये क्विंटल दराने विकले गेले. लिलावासाठी बाजार समितीचे दोन अधिकारी व तीन कर्मचारी तैनात केले होते. हमाली व तोलाई वगळता शेतकऱ्यांच्या पट्टीत कुठलीही कपात नाही. शिवाय पैशाची हमी, हे येथील सूत्र आहे असे बाजार समितीतून सांगण्यात आले.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...