औरंगाबादमध्ये सोयाबीन, ज्वारी स्थिर, तुरीच्या दरात चढ-उतार

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात बाजरी, हरभरा, मका, तूर, ज्वारी व सोयाबीनच्या आवकेत चढ-उतार पाहायला मिळाला.
Soybean in Aurangabad, sorghum stable, fluctuations in turi prices
Soybean in Aurangabad, sorghum stable, fluctuations in turi prices

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात बाजरी, हरभरा, मका, तूर, ज्वारी व सोयाबीनच्या आवकेत चढ-उतार पाहायला मिळाला. दुसरीकडे सोयाबीन, ज्वारी, बाजरी, हरभऱ्याचे दर जवळपास स्थिर तर तुरीच्या दरात आवके प्रमाणेच चढ-उतार पाहायला मिळाला. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये गत आठवड्यात २३ जानेवारीपर्यंत ४३६ क्‍विंटल बाजरीची आवक झाली. २२ ते १३७ क्‍विंटल दरम्यान बाजरीच्या आवकेत चढ-उतार पाहायला मिळाला. दुसरीकडे सरासरी दर मात्र ११७० ते १३१२ दरम्यान स्थिरच राहिले. हरभऱ्याची आठवड्यात केवळ चार वेळा आवक झाली. त्यातही दोन वेळा जवळपास १० क्‍विंटल आवक झालेल्या गावरान हरभऱ्याला सरासरी ३१०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. तर अनुक्रमे ३ व ४ असा दोन वेळा आवक झालेल्या काबुली हरभऱ्याचे सरासरी दर ५३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

मक्याची आवक सर्वाधिक ३९१६ क्‍विंटल झाली. ५१० ते ८२७ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या मक्याचे सरासरी दर १५० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान स्थिरच राहिले. मक्यापाठोपाठ २८६२ क्‍विंटल तुरीची आवक झाली. ३१७ ते ६४७ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या तुरीला सरासरी ५१२२ ते ५४३३ रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान दर मिळाला. 

सोयाबीनला क्विंटलला ४०५० ते ४२०० रुपये 

ज्वारीची आवक ४१ क्‍विंटल झाली. चार वेळा ३ ते १७ क्‍विंटल दरम्यान आवक झालेल्या ज्वारीला सरासरी १७०० ते १८५० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान दर मिळाला. सोयाबीनच्या आवकेतही चढ-उतारच राहिला. ३ ते ७५ किवंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या सोयाबीनला सरासरी ४०५० ते ४२०० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com