अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५९० रुपये प्रतिक्विंटल

अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५९० रुपये प्रतिक्विंटल
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५९० रुपये प्रतिक्विंटल

अकोला ः हंगामाच्या तोंडावर पैशांची तजवीज करण्यासाठी आजवर साठवून ठेवलेली सोयाबीन बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. मंगळवारी (ता. १८) स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक सुमारे २०४२ क्विंटल झाली होती. सोयाबीनचा दर कमीत कमी ३४५० व जास्तीत जास्त ३६१० रुपये प्रतिक्विंटल इतका मिळाला. सरासरी ३५९० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता.    

येथील बाजारात हरभऱ्याच्या आवकेतही सुधारणा दिसत आहे. ७३८ क्विंटलची आवक झाली होती. हरभरा ३९०० ते ४२५० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाला. सरासरी ४२२५ रुपयांचा दर होता. पांढरा हरभरा २६ पोते विक्रीसाठी आला होता. ३८०० ते ४४०० दरम्यान या हरभऱ्याचा दर होता. तुरीला सरासरी ५७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. ५०३ क्विंटलची आवक झाली. कमीत कमी भाव ४४०० व जास्तीत जास्त ५७५० रुपये दर होता.       

ज्वारीची नाममात्र तीन क्विंटल आवक झाली. ज्वारीला प्रतिक्विंटल १९५० ते २२५०; तर सरासरी २१०० रुपये असा दर होता. गव्हाची आवक २३४ क्विंटल झाली होती. गव्हाला प्रतिक्विंटल १७३० ते २०००; तर सरासरी १८०० रुपये असा दर मिळाला. उडदाच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत घसरण दिसून आली. मागील आठवड्यात कमीत कमी ४७०० व जास्तीत जास्त ५००० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळालेला उडीद मंगळवारी कमीत ३५०० व जास्तीत जास्त ४६०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाला. सरासरी ४३०० रुपये दर होता. १३६ क्विंटल आवक होती. मुगाची ४५ पोते आवक झाली होती. 

मुगाला ४५०० ते ५७५० दरम्यान दर मिळाला. ५०७५ रुपये सरासरी दर होता. मक्याची ८ पोते आवक होऊन २००० ते २१५० रुपये दर मिळाला. २०७५ रुपये सरासरी भाव होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com