Agriculture News in Marathi Soybean boom continues | Page 2 ||| Agrowon

सोयाबीनमधील तेजी कायम 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021

आवक कमी मात्र मागणी जास्त असल्याने देशातील बाजार समित्यांत सोयाबीन दरात १०० ते १५० रुपयांनी वाढ झाली आहे. तर चीनमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, वाहतुकीतील अडचणी आणि गाळपातील मार्जिन कमी झाल्याने सोयाबीन आयात घटली आहे.

पुणे ः आवक कमी मात्र मागणी जास्त असल्याने देशातील बाजार समित्यांत सोयाबीन दरात १०० ते १५० रुपयांनी वाढ झाली आहे. तर चीनमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, वाहतुकीतील अडचणी आणि गाळपातील मार्जिन कमी झाल्याने सोयाबीन आयात घटली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी सोयाबीन काहीशी घसरले मात्र फंडामेन्टल्स तेजीला पूरक असल्याचे जाणकारांनी सांगितले. 

देशभरातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात १०० ते १५० रुपयांची वाढ झाली आहे. बाजारात सोयाबीनची आवक कमी असून मागणी मात्र वाढत असल्याने सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सोमवारी लातूर बाजार समितीत सोयाबीनला सरासरी ५५५० तर अकोला बाजार समितीत ५४०० रुपये दर मिळाला. हिंगोलीत सरासरी ५३०० रुपये दराने सोयाबीनचे व्यवहार झाले. तर इंदोर बाजार समितीत ५४५० रुपये सरासरी दर मिळाला. शनिवारच्या तुलनेत देशातील जवळपास सर्वंच बाजार समित्यांत १०० ते १५० रुपयांची सुधारणा झाली आहे. 

चीनची आयात घटली 
चीनची सोयाबीन आयात ऑक्टोबर महिन्यात ४१.२ टक्क्यांनी कमी झाली आहे. मार्च २०२० नंतर ऑक्टोबरमध्ये चीनने सर्वांत कमी आयात केली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, वाहतुकीतील अडचणी आणि गाळपातील मार्जिन कमी झाल्याने चीनमधून सोयाबीनला कमी मागणी येत आहे. चीनने ऑक्टोबर महिन्यात ५१.१ लाख टन सोयाबीन आयात केली. तर त्याआधी ८६.९ लाख टन आयात केली होती. तर सप्टेंबर महिन्यात ६८.८ लाख टन सोयाबीनची आयात झाली होती. चीनने ऑक्टोबरपर्यंत यंदा ७९०.८ लाख टन सोयाबीनची आयात केली आहे.

ही आयात मागील वर्षी याच काळात झालेल्या आयातीच्या तुलनेत ५ टक्क्यांनी कमी आहे. चीनमध्ये कोरोनानंतर वराहपालन उद्योग वाढत असताना सोयापेंडला चांगली मागणी राहील, असे गृहित धरून येथील प्रक्रिया उद्योगाने सुरुवातील मोठी खरेदी केली. सोयाबीन प्रक्रिया मार्जिनमध्ये जून महिन्यात घसरण झाल्यानंतर स्पटेंबर महिन्यात मार्जिन निगेटिव्ह झाले होते. त्यानंतर स्टॉक कमी झाल्याने मार्जिन वाढले. 

सीबॉटवरील दर 
आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी सोयाबीन दरात काहीशी घसरण झाली. मात्र सध्याची परिस्थिती दरवाढीला पूरक असल्याचे जाणकारांनी सांगितले. सोमवारी पाच सत्रांत पहिल्यांदा दर कमी झाले. सोयाबीन फंडामेंटल्स सध्या तेजीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे दरात झालेली घसरण जास्त काळ टिकाणार नाही, जाणकारांनी सांगितले. सोमवारी सीबॉटवर जानेवारी २०२२चे करार १२.४० डॉलर प्रति बुशेल्सनी झाले आहेत. 

प्रतिक्रिया 

वाशीम बाजार समितीत सोयाबीनला किमान ४५०० रुपये आणि कमाल ६३०० रुपये दर मिळाला. बाजारात दिवाळीनंतर केवळ एक ते दीड हजार पोत्यांनी आवक सुधारली आहे. सध्या बाजारात सात हजार पोत्यांची आवक होत आहे. 
- हरिओम भोयर, सोयाबीन व्यापारी, वाशीम 
 

बाजारात अपेक्षेप्रमाणे आवक वाढली नाही. आवकेत किरकोळ वाढ झाली आहे. लातूर बाजार समितीत सोमवारी ३० हजार पोत्यांच्या दरम्यान आवक झाली. तर सरासरी दर ५५०० रुपये मिळाला. 
- अशोक अगरवाल, सोयाबीन व्यापारी, लातूर 
 

 
 


इतर अॅग्रोमनी
आयात उडदाला ग्राहक मिळेना पुणे : देशात यंदा उडीद उत्पादनात घट झाली मात्र...
तुरीचे दर स्थिरावले; नवीन तूर पुढील...पुणे : देशातील नवीन तूर डिसेंबरपासून बाजार येणार...
खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढजळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२००...
कापूस उत्पादक देशांमध्ये पुरवठा २०...जळगाव : जगात कापसाचा मोठा तुटवडा तयार होत आहे....
कंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही...पुणे : चालू वर्षीत शेतीमालासह इतर वस्तूंच्या...
धनत्रयोदशीला जळगावात ३० किलो सोने विक्रीजळगाव : जळगावची केळी व अस्सल सोन्यासाठी सुवर्ण...
जगभरात कापसाचे दर चढेच राहतीलपुणे : जागतिक कापूस वापरात होणारी वाढ, कमी शिल्लक...
तुरीला हवा हमीभाव खरेदीचा आधारपुणे : पुढील महिन्यापासून नवीन तुरीची बाजारात आवक...
दिवाळीमुळे हळदीला उठावपुणे : दिवाळीमुळे हळदीच्या मागणीत वाढ झाली आहे....
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
खाद्यतेलाच्या दराऐवजी सोयाबीन दरात मोठी...पुणे : निवडणुका आणि सणांच्या पार्श्‍वभूमीवर...
मोदीजी, तुमच्यासारख्या व्यक्तीकडून ही...अहमदाबाद, गुजरात : खरिपातील तेलबिया बाजारात...
मागणीमुळे कापसाला यंदा दराची झळाळीपुणे : कोरोनानंतरच्या काळात वाढलेली मागणी आणि...
खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळे मोहरीच्या...पुणे : खाद्यतेलाच्या वाढत्या दर आणि...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
भारतीय साखरेसाठी यंदा ‘फिलगुड’गेल्या महिन्याच्या कालावधीत साखर उद्योगासाठी...
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
‘एम’ अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील...पुणे ः देशपातळीवर कृषी निविष्ठा निर्मिती...
भारतात होणारी सोयापेंड निर्यात...पुणे : भारत सरकारने जणुकीय सुधारित सोयापेंड...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....