Agriculture news in marathi Soybean boom uninterrupted | Page 2 ||| Agrowon

सोयाबीनची तेजी अबाधित 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 एप्रिल 2021

यंदा सोयाबीच्या दरांमध्ये झालेली सुधारणा कायम राहण्याची शक्यता आहे. अंदाजापेक्षा उत्पादनात घट झाल्याने पुरवठ्यावर ताण आला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या दरांमध्ये सुधारणा झाल्याने देशांतर्गत किमतींना आधार मिळतो आहे. 

पुणे ः यंदा सोयाबीच्या दरांमध्ये झालेली सुधारणा कायम राहण्याची शक्यता आहे. अंदाजापेक्षा उत्पादनात घट झाल्याने पुरवठ्यावर ताण आला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या दरांमध्ये सुधारणा झाल्याने देशांतर्गत किमतींना आधार मिळतो आहे. 

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार, यंदा सोयाबीनेचा १३७ लाख टन उत्पादनाचा अंदाज दिला आहे, सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (सोपा) १०४.६ लाख टन उत्पादनाचा अंदाज दिला आहे. असे असले तरी बाजारात होत असलेली आवक बघता, ८० ते ८५ लाख टन इतकाच अंदाज व्यापारी आणि समीक्षकांनी बंधला आहे. गेल्या एक ते दीड महिन्यात, रोजची आवक एक लाख पोत्यांपर्यंतच मर्यादित आहे. 
सोयाबीनला चांगले दर मिळाल्यामुळे येत्या खरीप हंगामात सोयाबीनच्या लागवडीत वाढ होणे अपेक्षित आहे. असे असले तरी नवीन पिकाची आवक ऑक्टोबर आधी सुरू होणार नसल्याने इतक्यातच सोयाबीनचे दर थंडावण्याची शक्यता दिसत नाही. त्याचा परिपाक सोयाबीनच्या देशांतर्गत किमतींवर झाला आहे. एनसीडीईएक्सवरील सोयबीनचे हजर (स्पॉट) भाव ६,५०० रुपयांच्यावर आहेत. मात्र एप्रिलच्या वायद्यांची सध्याची पातळी बघता भावात अजून सुधारणा अपेक्षित नाही. 

मागील आठवड्यात अकोला बाजारपेठेत सोयाबीनला ६,००० रुपयांचा दर मिळाला. तसेच वाशीम बाजार समितीत ६,३५० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. वाशीममध्ये दीड हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली होती. तर अमरावती आणि उमरेड बाजार समितीमध्ये भाव अनुक्रमे ६,००० आणि ६,२०० रुपयांपर्यंत गेले होते. 

सोयाबीनचा आंतरराष्ट्रीय बाजार 
ब्राझीलमधील पीक बाजारात आल्यानंतर सोयाबीनच्या किमती थंडावतील असा अंदाज होता. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारभाव बघता, तसे होताना दिसत नाही. तसेच मलेशिया, जो पाम तेलाचा मोठा निर्यातदार आहे. तेथे यंदा मजूरटंचाई आणि विपरीत हवामानामुळे पाम तेलाच्या उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे मलेशियातील पाम तेलाचे साठे घटल्याचा अंदाज रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोया तेलाचे भाव तेजीतच आहेत. नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी या काळात भारताची खाद्य तेल आयात ३.७ टक्क्यांनी घटली आहे. यंदा चीनकडूनही सोयाबीनची आयात वाढली आहे. तसेच अर्जंटिनामध्ये उत्पादनात आणि अमेरिकेतील सोयाबीनचे साठ्यांमध्ये घट अपेक्षित आहे. गेल्या काही दिवसांत अमेरिकेतील सोयाबीनच्या दराची पातळी काही प्रमाणात कमी झाली असून, सोयाबीन आता परत १४ डॉलरच्या जवळपास आहे. 

बाजार समिती आवक (क्विंटलमध्ये) किमान कमाल सरासरी 
उद्गिर १४२५ ६३८० ६४८० ६४०० 
कारंजा १४०० ६०५० ६४३० ६२५० 
लातूर ६७६३ ३९६१ ६४५० ६३०० 
अकोला १०५७ ६००० ६३०० ६१५० 
हिंगणघाट १७६६ ५००० ६५५५ ५५७० 
वाशीम २२३१ ६२०० ६५०० ६४०० 
स्रोत : MSAMB (ता: ६ एप्रिल)

इतर अॅग्रोमनी
राज्यातून २० लाख टन साखरनिर्यातीचे करार कोल्हापूर ः यंदा साखर उत्पादनाबरोबरच...
आयातीने तुरीच्या दरावर परिणाम शक्य पुणे ः उडीद आयातीला गेल्या आठवड्यात परवानगी...
आवक वाढूनही हरभरा दर टिकून पुणे ः यंदा हरभरा उत्पादनात घटीचा अंदाज आणि सण...
देशातील कापूस उत्पादन ३५८ लाख गाठींवर...नवी दिल्ली ः देशात यापूर्वी कापसाचे ३६० लाख गाठी...
मोहरीला दराचा ‘तडका’ पुणे ः राजस्थानमध्ये मोहरीच्या दराने हमीभावाचा...
हळदीची आवक वाढू लागली सांगली/परभणी ः बाजार समित्यांत हळदीची आवक वाढू...
देशात विक्रमी फलोत्पादनाचा अंदाज पुणे ः देशात २०२०-२१ मध्ये फलोत्पादनात फळांचे १०३...
चीनकडून शेतीमालाची आक्रमक खरेदी पुणे ः जागतिक पातळीवर जवळपास सर्वच शेतमालाची...
हरभरा दरात घसरणीची शक्यता कमीपुणे ः हरभरा आवक वाढत असून पुढील १० ते १२ दिवसांत...
तेलबिया उत्पादनात वाढ वॉशिंग्टन ः जागतिक तेलबिया उत्पादनात फेब्रुवारी...
सांगली बाजार समितीत हळदीची आवक वाढलीसांगली ः  कोरोना विषाणूचा वाढता...
सरकारी आकड्यांपेक्षा हरभरा उत्पादनात घट यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच पिकांना बदलत्या...
देशात साखर उत्पादनात ४० लाख टनांनी वाढलेकोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांनी...
केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता अनेक...नवी दिल्ली ः केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता...
पाकिस्तानची भारतीय कापसाला पसंती जळगाव ः पाकिस्तान कापसासाठी भारताच्या दारात...
हरभरा बाजारात सुधाराची चिन्हे पुणे ः बाजारात हरभरा आवक सुरू झाली आहे....
बाजारात तूर खातेय भाव; वाढ कायम पुणे ः इतर कडधान्य पिकांसह तूर उत्पादनातही घट...
हळदीला दराचा ‘रंग’ पुणे ः हळद उत्पादनात घट झाल्याने यंदा हळदीचे दर...
अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन नवी दिल्ली ः देशात यंदा अन्नधान्याचे विक्रमी...
राष्ट्रीय खाद्यतेल मिशनचा यंदाही चकवापुणे : राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची यंदाही घोषणा न...