Agriculture News in Marathi Soybean-cotton became earthy | Page 4 ||| Agrowon

यवतमाळ : सोयाबीन-कपाशी झाले मातीमोल 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 ऑक्टोबर 2021

यवतमाळ  जिल्ह्याभरात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यंदा पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. त्यामुळे जिल्हा ओल्या दुष्काळाच्या सावटात असून, अजूनही पावसाची रिपरिप सुरूच आहे. दररोज येणाऱ्या पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. 

यवतमाळ : जिल्ह्याभरात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यंदा पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. त्यामुळे जिल्हा ओल्या दुष्काळाच्या सावटात असून, अजूनही पावसाची रिपरिप सुरूच आहे. दररोज येणाऱ्या पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. म्हणून कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या रेकॉर्ड ब्रेक २१३ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ९२६.८० आहे. आतापर्यंत तब्बल १,००८ मिमीच्या वर पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीपेक्षा १२९ टक्के पाऊस कोसळला आहे. अजूनही पावसाची संततधार सुरूच आहे. आणखी दोन दिवस पावसाचा मुक्काम असण्याचा अंदाज आहे. पाऊस सुरूच असल्याने शेतकऱ्यांच्या घरात येणारी पिके पावसामुळे वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अति पावसाने शेतकऱ्यांवर संकटाचे ढग कायम आहेत. उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. 

जिल्ह्यात कापूस, सोयाबीनसह तुरीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. ज्वारी, उडीद आदी पिकांची लागवडही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीन व कापूस या पिकांना बसला आहे. सोयाबीन शेंगांना झाडावरच कोंब फुटत आहेत. कपाशीचे पीक वाकले असून, बोंडे काळी पडत आहेत. अतिवृष्टीमुळे आधीच १ लाख ७५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे. नदी-नाल्यांना पूर आलेले आहेत.

नदी काठालगतच्या शेतात पाणी शिरले आहे. त्याचा फटका शेतपिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यातच आता सोयाबीन काढणी व कापसाचा वेचा सुरू आहे. अशातच दोन दिवसांपासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. सध्या सुरू असलेल्या पावसाने कापूस पिकांचे सर्वाधिक नुकसान होत आहे. 

पावसाच्या नुकसानीची हवी मदत 
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने मदत जाहीर केली आहे. मात्र संततधार पावसाने नुकसान झालेल्या शेतपिकांचे क्षेत्र मोठे आहे. या संदर्भात अजूनही शासनस्तरावरून निर्णय झालेला नाही. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने नुकसानीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे शासनाने मदतीबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. 

तालुकानिहाय झालेला पाऊस 
यवतमाळ-५०.५ 
बाभूळगाव-१८.९ 
कळंब-२२.६ 
दारव्हा-५७.१ 
दिग्रस-५२.५ 
आर्णी-३७.५ 
नेर-४०.४ 
पुसद-५०.७ 
उमरखेड-५०.८ 
महागाव-३५.० 
वणी-१९.८ 
मारेगाव-२०.० 
झरी जामणी-१८.४ 
केळापूर-९.९ 
घाटंजी-४३.६ 
राळेगाव-१७.४ 

प्रतिक्रिया 

जिल्ह्यात पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पंचनामे झाल्यावर मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. 
-अमोल येडगे, जिल्हाधिकारी, यवतमाळ 


इतर बातम्या
  वखारच्या ऑनलाइन शेतीमाल तारण कर्जात...पुणे : राज्य वखार महामंडळाच्या ऑनलाइन (ब्लॉकचेन)...
हिंगोलीत सोयाबीन दरात सुधारणाहिंगोली ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात ज्वारी, गहू,...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या (२०२१-...
डाळिंबाच्या सुकर वाटेसाठी गडकरी...जालना : संपूर्ण राज्यात महत्वाचे फळपीक असलेल्या...
अमरावती जिल्ह्याती ‘पीएम किसान’ची ५...अमरावती ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभ...
कृष्णाकाठावर मजुरांअभावी ऊस रोपांची लागणभिलवडी, जि. सांगली ः कृष्णाकाठावर उसाच्या कांडी...
कोल्हापूर, सांगलीत ‘कृषिपंप...कोल्हापूर  : गेल्या तीन दिवसांत कोल्हापूर व...
वीज पुरवठा सुरळीत  करण्यासाठी इंदापुरात...पुणे ः जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील थकबाकीदार...
खानदेशात पीककर्ज वितरणाला येईना गतीजळगाव ः  खानदेशात रब्बी हंगामासाठी पीक...
सोयाबीन दराची घोडदौड सुरूच राहणार पुणे ः तेलबिया आणि खाद्यतेलाच्या दारातील...
पुणे बाजार समितीचा वारणारांना चाप ः गरडपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे,...
जळगाव जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेकजळगाव ः जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना अतिवृष्टीने...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्याच्या किमान तापमानात आणखी घट झाल्याने...
पावसाला पोषक हवामानामुळे किमान तापमानात...पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या किमान...
वीजप्रश्नी संतप्त शेतकरी  महावितरण...नाशिक : महावितरण कंपनीकडून सटाणा तालुक्यात थकीत...
कापूस खेडा खरेदी करणाऱ्या ...बुलडाणा ः खेडा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना...
कडुलिंबाची झाडे वाळू लागली पुणे नगर ः नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील...
राज्यातील १२१ आदिवासी  आश्रमशाळा होणार...पुणे ः शिक्षण व्यवस्थेमधील बदलांना सामोरे जात...
लाल कांद्याला उन्हाळच्या  तुलनेत मिळतोय...नाशिक : दिवाळीनंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी...पुणे नगर ः राज्यातील मुदत संपलेल्या परंतु,...