Agriculture news in marathi, Soybean, cotton damage due to rains in Khandesh | Agrowon

खानदेशात पावसाने सोयाबीन, कापसाचे नुकसान

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021

जळगाव: खानदेशात अनेक भागात शनिवारी (ता. १६) रात्रीपासून पावसाने हजेरी लावली. रविवारी (ता.१७) दिवसभर व रात्री झालेल्या संततधारेमुळे वाघूर धरण पुन्हा शंभर टक्के भरले.

जळगाव: खानदेशात अनेक भागात शनिवारी (ता. १६) रात्रीपासून पावसाने हजेरी लावली. रविवारी (ता.१७) दिवसभर व रात्री झालेल्या संततधारेमुळे वाघूर धरण पुन्हा शंभर टक्के भरले. रविवारी (ता.१७) वाघूर धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ११९ टक्के पाऊस झाला आहे. तर, धुळ्यातही १०५ टक्क्यांवर पाऊस झाला. या ठिकाणी अतिवृष्टीने खरीप हंगाम हातचा गेला आहे. अशा स्थितीत पावसाच्या तडाख्याने कापूस, सोयाबीनच्या पिकांचे नुकसान झाले आहे. 

वाघूर धरण क्षेत्रात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे पातळीत वाढ होत आहे. सद्यःस्थितीत वाघूर धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. रविवारी सकाळी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले. धरणातून दोन हजार ७०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. यानंतर आणखी चार दरवाजे उघडण्यात आले. एकूण आठ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे धरणातून १३ हजार ३७७ क्यूसेक विसर्ग होत आहे. यामुळे नदीला पूर आला आहे. कोणीही नदीपात्राजवळ जाऊ नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले. 

जळगाव जिल्ह्यात पावसाची सरासरी ६३२.६ मिलिमीटर आहे. आतापर्यंत ७५३.९ मिलिमीटर अर्थात, ११९.२ टक्के पाऊस झाला.  तर धुळ्यातही सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच ८०० मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला आहे. पावसामुळे पिकांची मोठी हानी खानदेशात सुरूच आहे.

शेतीकामे ठप्प आहेत. सोयाबीन पुरता हातचा गेल्यात जमा आहे. कापूसही काळवंडला आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, एरंडोल, धरणगाव, भुसावळ, जामनेर, पाचोरा आदी भागात पावसाने अधिक नुकसान झाले आहे. धुळ्यातही धुळे, साक्री भागात पीकहानी झाली.


इतर बातम्या
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
वीज पुरवठा सुरळीत न केल्यास  ढोरा...शेवगाव, जि. नगर : महावितरणने थकीत वीज बिलासाठी...
सहा हजार शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
मॉन्सूनोत्तर पावसाचा सांगलीत  १२ हजार...सांगली : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष,...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
उचंगी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के...   कोल्हापूर : आजरा तालुक्यातील उचंगी...
श्रीरामपुरात बिबट्याचे चार तास...श्रीरामपूर, जि. नगर ः श्रीरामपूर शहरातील मोरगे...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू :...सांगली ः गेल्या काही दिवसापांसून संपूर्ण राज्यात...
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी  केंद्राचे...कोल्हापूर : क्षारपड जमीन सुधारणा योजनेस केंद्र...
पावसामुळे द्राक्ष बागांचे  दोन हजार...पुणे ः जिल्‍ह्यात गेल्या आठवड्यात १ आणि २ डिसेंबर...
खानदेशात पुन्हा ढगाळ वातावरण कायम जळगाव ः  खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण...
चाळीसगाव (जि.जळगाव) : अवकाळी पावसामुळे...चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव, पाचोरा, भडगाव आदी...
जळगावः अॅग्रोवन व आयसीएल कंपनीतर्फे...जळगाव ः ॲग्रोवन आणि आयसीएल कंपनीच्या संयुक्त...