सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या  आंदोलनाची बुलडाण्यात ठिणगी  Of soybean-cotton growers Spark in the bulldozer of the movement
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या  आंदोलनाची बुलडाण्यात ठिणगी  Of soybean-cotton growers Spark in the bulldozer of the movement

सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या  आंदोलनाची बुलडाण्यात ठिणगी 

३१ ऑक्टोबरला बुलडाण्यात एल्गार मोर्चा काढून कापूस-सोयाबीन उत्पादकांचे आंदोलन सर्वत्र सुरू होईल, अशी घोषणाही तुपकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

बुलडाणा : विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील कापूस, सोयाबीन उत्पादकांच्या प्रश्‍नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, पुढील आंदोलनाची ठिणगी शुक्रवारी (ता.२२) बुलडाण्यात पडली. येथे शेकडो कार्यकर्त्यांनी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली पावसाने खराब झालेले सोयाबीन जाळून आंदोलनाला सुरुवात केली. तर ३१ ऑक्टोबरला बुलडाण्यात एल्गार मोर्चा काढून कापूस-सोयाबीन उत्पादकांचे आंदोलन सर्वत्र सुरू होईल, अशी घोषणाही तुपकर यांनी पत्रकार परिषदेत केली.  सततच्या पावसाने सोयाबीनसह खरिपातील इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. सोयाबीनचा प्रति क्विंटल किमान भाव आठ हजार, कापसाचा १२ हजार रुपये मिळावा. केंद्राने तत्काळ धोरण आखावे, बुलडाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टिग्रस्तांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, हेक्टरची मर्यादा ठेवू नये, मागील व यंदाच्या हंगामासाठीचा १०० टक्के पीकविमा देण्यासाठी कंपन्यांना बाध्य करावे,

नदी काठच्या खरडून गेलेल्या जमिनी तयार करण्यासाठी १०० टक्के नुकसानभरपाई द्यावी, कृषिपंपाचे वीजबिल माफ करावे, लॉकडाउन काळातील घरगुती वीजबिल माफ करा, कनेक्शन तोडणे बंद करा, कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम तत्काळ जमा करा, सोयापेंड आयात तत्काळ थांबवा, पामतेल व खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढवा, खाद्यतेल व तेलबियांवरील मर्यादा साठा अट शिथिल करा, सोयाबीनचा बाजारभाव आठ हजार रुपये असताना पाच हजाराने खरेदी करणाऱ्या महाबीजने भावफरक बीजोत्पादकांना द्यावा, अशा विविध मागण्यांसाठी हा एल्गार मोर्चा काढला जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com