Agriculture News in Marathi Of soybean-cotton growers Spark in the bulldozer of the movement | Agrowon

सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या  आंदोलनाची बुलडाण्यात ठिणगी 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 ऑक्टोबर 2021

३१ ऑक्टोबरला बुलडाण्यात एल्गार मोर्चा काढून कापूस-सोयाबीन उत्पादकांचे आंदोलन सर्वत्र सुरू होईल, अशी घोषणाही तुपकर यांनी पत्रकार परिषदेत केली. 

बुलडाणा : विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील कापूस, सोयाबीन उत्पादकांच्या प्रश्‍नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, पुढील आंदोलनाची ठिणगी शुक्रवारी (ता.२२) बुलडाण्यात पडली. येथे शेकडो कार्यकर्त्यांनी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली पावसाने खराब झालेले सोयाबीन जाळून आंदोलनाला सुरुवात केली. तर ३१ ऑक्टोबरला बुलडाण्यात एल्गार मोर्चा काढून कापूस-सोयाबीन उत्पादकांचे आंदोलन सर्वत्र सुरू होईल, अशी घोषणाही तुपकर यांनी पत्रकार परिषदेत केली. 

सततच्या पावसाने सोयाबीनसह खरिपातील इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. सोयाबीनचा प्रति क्विंटल किमान भाव आठ हजार, कापसाचा १२ हजार रुपये मिळावा. केंद्राने तत्काळ धोरण आखावे, बुलडाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टिग्रस्तांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, हेक्टरची मर्यादा ठेवू नये, मागील व यंदाच्या हंगामासाठीचा १०० टक्के पीकविमा देण्यासाठी कंपन्यांना बाध्य करावे,

 

नदी काठच्या खरडून गेलेल्या जमिनी तयार करण्यासाठी १०० टक्के नुकसानभरपाई द्यावी, कृषिपंपाचे वीजबिल माफ करावे, लॉकडाउन काळातील घरगुती वीजबिल माफ करा, कनेक्शन तोडणे बंद करा, कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम तत्काळ जमा करा, सोयापेंड आयात तत्काळ थांबवा, पामतेल व खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढवा, खाद्यतेल व तेलबियांवरील मर्यादा साठा अट शिथिल करा, सोयाबीनचा बाजारभाव आठ हजार रुपये असताना पाच हजाराने खरेदी करणाऱ्या महाबीजने भावफरक बीजोत्पादकांना द्यावा, अशा विविध मागण्यांसाठी हा एल्गार मोर्चा काढला जाणार आहे.


इतर बातम्या
जळगाव जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेकजळगाव ः जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना अतिवृष्टीने...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्याच्या किमान तापमानात आणखी घट झाल्याने...
पावसाला पोषक हवामानामुळे किमान तापमानात...पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या किमान...
वीजप्रश्नी संतप्त शेतकरी  महावितरण...नाशिक : महावितरण कंपनीकडून सटाणा तालुक्यात थकीत...
कापूस खेडा खरेदी करणाऱ्या ...बुलडाणा ः खेडा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना...
कडुलिंबाची झाडे वाळू लागली पुणे नगर ः नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील...
राज्यातील १२१ आदिवासी  आश्रमशाळा होणार...पुणे ः शिक्षण व्यवस्थेमधील बदलांना सामोरे जात...
लाल कांद्याला उन्हाळच्या  तुलनेत मिळतोय...नाशिक : दिवाळीनंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी...पुणे नगर ः राज्यातील मुदत संपलेल्या परंतु,...
सत्तावीस हजार सहकारी संस्थांच्या ...पुणे ः राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय...
‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी ...सातारा ः स्ट्रॅाबेरी मातृ रोपांवरील आयात शुल्क...
शेतकरी उत्पन्न दुपटीच्या बैठकीला २३... नवी दिल्ली ः संसदेच्या कृषी विषयक स्थायी...
दिवाळी सुटीनंतरच्या बेदाणा  सौद्यात...सांगली ः दिवाळीच्या सुटीनंतर सांगली कृषी उत्पन्न...
स्टॉक लिमिटला नकार;  सोयाबीन बाजाराला...पुणे ः राज्य सरकारने सोयाबीनवर स्टॉक लिमिट लावणार...
भात खरेदीच्या जाचक अटीतून शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरीः ज्या शेतकऱ्यांच्या सात-बारामध्ये...
बीज प्रक्रियेसाठी यंत्राचा वापर वाढलावाशीम : शेतकऱ्यांमध्ये बीजप्रक्रियेचे महत्त्व...
सांगलीत कृषिपंपांची वीजजोड तोडणी सुरुसांगली ः कृषिपंपांच्या वीज बिल वसुलीसाठी...
सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे तीन...पुणे ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या...
फेरफार नोंदीत पुणे जिल्हा आघाडीवरपुणे ः शेत जमिनी खरेदी विक्री दरम्यान अंत्यत...
सोलापूर जिल्ह्यात खरिपातील पीक ...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप...