नांदेडमध्ये पावसामुळे सोयाबीन, कपाशीला दिलासा

नांदेड: जिल्ह्यात मागील काही दिवसाच्या विश्रांतीनंतर रविवारी (ता. ६) सायंकाळी सहाच्या सुमारास काही तालुक्यात दमदार पाऊस झाला.
Soybean, cotton relief due to rains in Nanded
Soybean, cotton relief due to rains in Nanded

नांदेड : जिल्ह्यात मागील काही दिवसाच्या विश्रांतीनंतर रविवारी (ता. ६) सायंकाळी सहाच्या सुमारास काही तालुक्यात दमदार पाऊस झाला. यामुळे ताण पडलेल्या सोयाबीन, कपाशी पिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु, इतरत्र मात्र पावसाची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यात सोमवारी (ता.७) सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी ९.२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आजपर्यंत ५७० मि.मीनुसार ७२.२६ टक्के पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे खरिपातील महत्वाचे पीक असलेल्या सोयाबीनला शेंगा भरण्याच्या कालावधीत ताण पडला होता. यामुळे अनेक ठिकाणी पीक वाळत असल्याचे चित्र होते. यासोबतच सोयाबीनमधील तूर, कपाशी पिकालाही पाऊस नसल्यामुळे फटका बसला. सुरुवातीस दमदार पाऊस झाल्यामुळे खरीप पिकाची वाढ समाधानकारक होती. नंतर, मात्र पावसाचे प्रमाण कमी झाले. तापमानात वाढ झाल्याने पिकांना ताण पडला होता. 

मागील काही दिवसांपासून तर हलक्‍या जमिनीतील पिके वाळू लागली होती. पाण्याची व्यवस्था आहे, अशा शेतकऱ्यांनी विहीर, कूपनलिका, ओढ्याचे पाणी पिकांना दिले. परंतु, पाणी नसलेल्या भागात मात्र पिके वाळत होती. अशातच रविवारी (ता. ६) सायंकाळी सहाच्या सुमारास जिल्ह्यातील नांदेड, मुखेड, कंधार, लोहा, माहूर, हिमायतनगर, मुदखेड, देगलूर व हदगाव या तालुक्यातील काही भागात पाऊस झाला. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले. जिल्ह्यात सोमवारी (ता. सात) सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासात सरासरी ९.२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आजपर्यंत ५७० मिलिमीटर नुसार ७२.२६ टक्के पाऊस झाला आहे.

तालुकानिहाय पाऊस (सरासरी)

नांदेड ६.४०, मुखेड २३.१०, लोहा २६.४०, कंधार  २३.३०, हदगाव १०.३०, भोकर ०.३०, देगलूर ७.१०, किनवट ०.१०, मुदखेड ८.१०, हिमायतनगर ६.४०, माहूर १०.६०. 

मंडळनिहाय पाऊस (मि.मीमध्ये)

लिंबगाव ३९, जांब ४८, येवती २०, जाहुर २३, चांडोळा २४, बार्हाळी २३, मुक्रमाबाद २३, कंधार २३, फुलवळ ३०, पेठवडज २३, बारूळ ५७, लोहा २६, माळाकोळी १८, कापसी २६, सोनखेड ३४,  शेवडी २६, कलंबर २६, हदगाव १०,  तळणी १०,  पिंपरखेड १६, शहापूर २८ व बारड १६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com