हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला फुटले मोड

हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून संततधार सुरू आहे. त्यामुळे बहुतांश भागात उडीद, मूग याप्रमाणे आता सोयाबीनच्या उभ्या पिकाला मोड फुटले आहेत.
 Soybean crop breaks in Hingoli district
Soybean crop breaks in Hingoli district

हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून संततधार सुरू आहे. त्यामुळे बहुतांश भागात उडीद, मूग याप्रमाणे आता सोयाबीनच्या उभ्या पिकाला मोड फुटले आहेत.

सोयाबीनला लागलेल्या शेंगामधून मोड निघत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. तर, काही भागात सोयाबीनची वाढ झाली; पण धुक्यामुळे फुलगळ झाल्यामुळे सोयाबीन झाडाच्या नुसत्या काड्या उभ्या आहेत. ज्वारी, हॅब्रिड, कपाशी, हळद पिकांचीही तिच स्थिती आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर कधी निसर्गाचा लहरीपणा उठतो, तर कधी हाती आलेल्या पिकाला भाव मिळत नाही. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा, सेनगाव तालुक्यातील काही भागात झालेल्या पावसाचा फटका पिकांना बसला आहे. मध्यतरी पावसाने ओढ दिल्याने पिकांना पावसाची आवश्यकता होती. मात्र, त्यानंतर सुरू झालेल्या संततधार पावसाने काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाला मोड फुटले. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात तीन लाख ८० हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. तर, दोन लाख ५८ हजार हेक्टरवर सोयाबीन पिकांची पेरणी झाली.

गिरगावातील शेतकरी अडचणीत

वसमत तालुक्यातील गिरगाव येथे चार दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे अतिवृष्टी झाली. त्यामुळे सोयाबीनला मोड फुटले. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. गिरगावसह परिसरातील परजना, खाजमापूर वाडी, बोरगाव खुर्द, सोमठाणा, पार्ड बुदुक, डिग्रस खुर्द या गावांत रविवारपासून मुसळधार पाऊस पडला. सोयाबीन पिकांना मोड फुटल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. मूग, उडीदसुद्धा शेतकऱ्यांच्या हातचे गेले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com