Agriculture news in Marathi Soybean crop in crisis in Nagar district this year too | Agrowon

नगर जिल्ह्यात यंदाही सोयाबीन पीक संकटात

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 सप्टेंबर 2020

यंदा पहिल्यापासूनच सोयाबीन पीक संकटात सापडले. काही दिवसात काढणीला येऊ पाहत असलेले पीक सततच्या पावसामुळे अडचणीत येत आहे. पाने पिवळी पडू लागली असून शेंगाही सडू लागल्या आहेत. सद्यःस्थितीचा विचार करता जिल्ह्यात पेरणी झालेल्यांपैकी पन्नास टक्के म्हणजे तीस ते चाळीस हजार हेक्टरला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.

नगर ः सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने लवकर पेरणी झाली. परंतु निकृष्ट बियाणे पुरवठ्यामुळे यंदा पहिल्यापासूनच सोयाबीन पीक संकटात सापडले. काही दिवसात काढणीला येऊ पाहत असलेले पीक सततच्या पावसामुळे अडचणीत येत आहे. पाने पिवळी पडू लागली असून शेंगाही सडू लागल्या आहेत. सद्यःस्थितीचा विचार करता जिल्ह्यात पेरणी झालेल्यांपैकी पन्नास टक्के म्हणजे तीस ते चाळीस हजार हेक्टरला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. पुणे

गतवर्षाप्रमाणे यंदाही सोयाबीनचे नुकसान होते की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र मोठे असते. गेल्यावर्षी ८८ हजार ९०५ हेक्टरवर तर यंदा ८८ हजार ०९४ हेक्टरवर सोयाबीनचे पेरणी झालेली आहे. यंदा चांगल्या पावसामुळे लवकर पेरणी झाली. मात्र, निकृष्ट बियाणे पुरवठा झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली.

सुरुवातीपासून सोयाबीन पीक अडचणीत असतानाही गतवर्षीच्या एवढी पेरणी झाली. मात्र, आता एेन काढणीला येण्याच्या काळातच सोयाबीनला अडचणी निर्माण झाल्या आहेत. सतत पडत असलेल्या पावसाने शेंगा सडू लागल्या आहेत.  शिवाय पिकांत पाणी साठवून राहू लागल्याने पाने पिवळी पडू लागली आहेत. अशीच परिस्थिती अजून काही दिवस राहिली तर सोयाबीनचे उत्पादनावर यंदाही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गतवर्षीही बसला होता मोठा फटका
गेल्यावर्षी नगर जिल्ह्यात ८८ हजार ९०५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, एेन काढणीच्या काळात परतीचा जोरदार पाऊस सुरू झाला आणि सलग वीस ते पंचवीस दिवस पाऊस सुरू राहिल्याने गतवर्षी साठ ते सत्तर हजार हेक्टरवरील पिकाची माती झाली होती. गेल्यावर्षी सोयाबीन उत्पादकांना कोट्यवधी रुपयाचा फटका बसला होता. गतवर्षी बियाणे उत्पादनावर झाला आणि यंदा पेरलेल्या बियाणांतून त्याचा परिणाम दिसून आले आहेत.

नगर जिल्ह्यात सततच्या पावसामुळे सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा फटका उत्पादक शेतकऱ्यांना बसणार असून उत्पादनात घट येणार हे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी प्रशासनाने अजून फारसे गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत.
- डाॅ. कृषीराज टकले, युवक नेते, रयत क्रांती शेतकरी संघटना


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
भारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...
मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...
सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...