नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सोयाबीनची काढणी सुरू; मजुरीत वाढ

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सोयाबीनची काढणी सुरू; मजुरीत वाढ
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सोयाबीनची काढणी सुरू; मजुरीत वाढ

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत खरिपातील सोयाबीनची काढणी सुरू झाली आहे. परंतु, उशिरा पेरणी झालेलल्या सोयाबीनच्या शेंगा भरण्यासाठी अजून पावसाची गरज आहे. यंदा सोयाबीन काढणीसाठीच्या मजुरीच्या दरामध्ये ५०० ते ७०० रुपयांपर्यंत वाढ झाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा ८ लाख ६३ हजार हेक्टवर सोयाबीनची पेरणी झाली. जून, जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरलेले, कमी कालावधीतील सोयाबीनचे पीक काढणीच्या अवस्थेत आहे. सप्टेंबरमध्ये या तीन जिल्ह्यांमधील अनेक मंडळांमध्ये सतत पाऊस झाला. दुसरीकडे अनेक मंडळांमध्ये उघडीप आहे. पावसामुळे परिक्वतेच्या अवस्थेतील सोयाबीनच्या शेंगा भिजून डागील झाल्या आहेत. 

गेल्या काही दिवसांत अधूनमधून पाऊस येत असला, तरी त्याचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन कापणी सुरू केली आहे. यंदा सोयाबीनचे प्रतिएकरी कापणी आणि जमा करून देण्याचे दर २ हजार ३०० ते ३ हजार   ३०० पर्यंत आहेत. मळणी यंत्रणाद्वारे काढणीचे दर प्रतिक्विंटल २०० ते ३०० रुपयांपर्यंत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत  यंदा काढणीच्या दरात ५०० ते ७०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. मजुरांची समस्या असलेल्या गावात दर जास्त आहेत.

‘‘गतवर्षीच्या तुलनेत यंदा काढणी आणि मळणी यंत्राच्या दरात वाढ झाली आहे. सोयाबीन काढणीसाठी पावसाने उघडीप देणे आवश्यक आहे’’, असे अर्धापूर (जि. नांदेड) येथील शेतकरी ज्ञानेश्वर माटे यांनी सांगितले.

‘‘उशिरा पेरणी केल्यामुळे सोयाबीनचे पीक अजून हिरवे आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासून पाऊस नाही. शेंगा भरण्यासाठी पावसाची गरज आहे,’’ असे गणपूर (जि. परभणी) येथील शेतकरी बाजीराव शेवाळे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com