agriculture news in Marathi soybean got 4311 rupees rate Maharashtra | Agrowon

सोयाबीनला मिळाला ४३११ रुपये दर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

पावसाआधी काढणी झालेल्या दर्जेदार सोयाबीनला वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत हंगामातील उच्चांकी ४३११ रुपये दर सोमवारी (ता.१२)मिळाला. 

वाशीम ः सोयाबीन काढणीच्या तोंडावर पाऊस सुरु झाल्याने मालाचे नुकसान होत आहे. पावसाआधी काढणी झालेल्या दर्जेदार सोयाबीनला वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत हंगामातील उच्चांकी ४३११ रुपये दर सोमवारी (ता.१२)मिळाला. बाजारात सुमारे चार हजार पोत्यांची आवक झाली होती. 

काही दिवसांपूर्वी तुरीच्या दरात तेजी आली. त्यापाठोपाठ आता सोयाबीनमध्येही तेजीचे दिवस तयार होत आहेत. प्रामुख्याने या हंगामात तयार झालेले व पावसापासून वाचलेले सोयाबीन बियाणे म्हणून वापरण्यासाठी खरेदी केले जात आहे. सोमवारी वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या सोयाबीनला वाढीव भाव मिळाला. सुमारे दोनशे क्विंटल सोयाबीनला हा दर मिळाला.

या हंगामातील नवीन सोयाबीनची काढणी सुरु असून बाजारपेठेत विक्रीसाठी आवक वाढू लागली आहे. वाशीम जिल्हा सोयाबीन उत्पादनात अग्रेसर मानला जातो. या जिल्ह्यातील दर्जेदार सोयाबीन बियाण्यासाठी अधिक प्रमाणात वापरले जाते. मागील दोन हंगामापासून सोयाबीन काढणीच्या वेळेसच पावसाने हजेरी लावत नुकसान केले. यंदाही सध्या अशीच स्थिती आहे.

सलग पावसामुळे अनेकांचे सोयाबीन सोंगणी होऊनही त्याची सुडी शेतातच पडून आहे. ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पावसाच्या तडाख्यातून सुटले, असा माल आता चांगला भाव खाऊ लागला आहे. सोमवारी वाशीममध्ये कमीत कमी ३८०० व जास्तीत जास्त ४३११ रुपयांचा सोयाबीनला भाव भेटला. ३९७५ पोत्यांची आवक झाली होती.

अकोल्यात सरासरी ३६५० रुपये 
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी सोयाबीनला सरासरी ३६५० रुपये भाव मिळाला. कमीत कमी ३३०० व जास्तीत जास्त ३८२५ रुपये दराने सोयाबीन विकले. ६८७९ पोत्यांची आवक होती.

पावसाचा दर्जावर परिणाम
यंदाचे सोयाबीन मोठ्या प्रमाणात भिजले आहे. रविवारी जिल्हाभर जोरदार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन सुडी पावसात भिजली. यामुळे सोयाबीनच्या दर्जाला फटका बसू शकतो. परिणामी आगामी काळात दर्जेदार सोयाबीनला वाढीव दर राहतील, असा अंदाज व्यापारी सूत्रांकडून व्यक्त करण्यात आला.


इतर अॅग्रो विशेष
ठिबक अनुदान वाटपाच्या  प्रक्रियेवर...पुणे : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून अनुदान...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान...
खानदेशात अतिपावसाने  कापूस पीकस्थिती...जळगाव : खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकाची स्थिती...
खाद्यतेल आयात शुल्क  कपातीचा ग्राहकांना...पुणे : केंद्र सरकारने देशांतर्गत वाढत्या...
सौरकृषी पंपाच्या  कुसुम योजनेला अखेर...पुणे : उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे गेली...
पीक नुकसान तक्रारीसाठी धडपड औरंगाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
पंधरा हजार एकरवर बांबू लागवडनगर ः जगात सगळ्यात वेगाने वाढणाऱ्या परंतु...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान...
मराठवाड्यात २०० मेगावॉटचा सौर प्रकल्प ः...औरंगाबाद ः मराठवाड्यात येत्या वर्षात २००...
विदर्भ, मराठवाड्यात कमी पावसाचा अंदाजपुणे : कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र आणि...
महावितरणच्या वीजग्राहकांसाठी रूफटॉपमुंबई : महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील...
सोयापेंडेसाठी आयातदारांची अनेक देशांत...पुणे ः केंद्र सरकारने जनुकीय सुधारित...
फळगळ विषयक ‘त्या’ संदेशापासून राहा सावधनागपूर ः केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेच्या...
प्रत्येक शाळेमध्ये उभारणार लोकसहभागातून...पुणे : वेगाने बदलत असलेल्या हवामानाची शाळेतील...
सेंद्रिय उत्पादनांचा ‘सात्त्विक कृषिधन...नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीप्रणीत शेतकरी उत्पादक...
आंबा, काजू, फणसापासून चॉकलेट मोदकांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोरे (वाडोस) येथील...
विमा कंपन्यांवर पूर्वसूचनांचा पाऊस !...पुणे : राज्याच्या विविध भागांत झालेल्या...
लाळ्या खुरकूत लसींची प्रतीक्षाच;...पुणे ः पावसाळा संपत आला तरी अद्याप राज्यातील दोन...
मॉन्सूनच्या परतीचा मुहूर्त लांबणारपुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून)...
राज्यात पावसाच्या उघडिपीची शक्यतापुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...