Agriculture news in Marathi Soybean growers should be compensated; Otherwise movement | Page 2 ||| Agrowon

सोयाबीन उत्पादकांना भरपाई द्यावी; अन्यथा आंदोलन

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटल्याने हातातोंडाशी आलेले हे पीक उद्ध्वस्त झाले आहे. पीक नुकसानीची तीव्रता महागाव, पुसद, उमरखेड तालुक्यात सर्वाधिक आहे. त्याची दखल घेत पंतप्रधान पीकविमा योजनेसह शासन स्तरावरून मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

यवतमाळ : जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटल्याने हातातोंडाशी आलेले हे पीक उद्ध्वस्त झाले आहे. पीक नुकसानीची तीव्रता महागाव, पुसद, उमरखेड तालुक्यात सर्वाधिक आहे. त्याची दखल घेत पंतप्रधान पीकविमा योजनेसह शासन स्तरावरून मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांना शेतकरी नेते मनीष जाधव यांच्या नेतृत्वात बुधवारी (ता. २३)  दिलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली. निवेदनानुसार जिल्ह्यात सुमारे चार लाख हेक्‍टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. परंतु हंगामाच्या सुरुवातीला निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा पुरवठा झाला. हे बियाणे जिल्ह्याच्या अनेक भागात उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली.

दुबार-तिबार पेरणी मुळे आधीच खर्चात वाढ झाली असताना त्याची काही अंशी भरपाई हंगामात अखेरीस पीक काढणी करून होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे परिपक्व अवस्थेतील सोयाबीन शेंगांना कोंब फुटल्याने हे पीक आता उद्ध्वस्त झाले आहे.

सोयाबीनमधून हाती काहीच लागणार नसल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत त्यांची अस्वस्थता लक्षात घेता नुकसानग्रस्त भागात सर्वेक्षण व पंचनाम्याची कारवाई सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. कोरोनामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. त्यानंतर आता निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत आहे. शासनाने या विषयाची गंभीरता लक्षात घेता या प्रकरणी हस्तक्षेप करून आठ दिवसाच्या आत पंचनाम्याचे आदेश देण्यात यावे, अन्यथा रचनात्मक मार्गाने आंदोलन केले जाईल व याची सारी जबाबदारी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाची असेल, असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदन देताना मनीष जाधव, शैलेश राठोड, अश्विन लोणकर, सुनील राठोड, प्रेम राठोड, दीपक पवार, रवी राठोड, युसूफ खान अलिवर खान पठाण, निशिकांत राऊत, प्रमोद यादव, अशोक चव्हाण, भीमराव राठोड, प्रशांत पवार, विनोद राठोड उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये वांगी सरासरी ८५०० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या...
पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे राखून...वाशीम : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अवेळी पाऊस...
कांदा बियाण्याचे दर कडाडलेसातारा ः कांद्याचे दर आठ हजारापर्यंत पोचले आहे....
नगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरणनगर : आठ दिवसांपूर्वी वाढ झालेल्या कांद्याच्या...
हळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ...दापोली, जि. रत्नागिरी ः कोकणातील हवामान हळद...
केळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीतनांदेड : चांगल्या पावसामुळे यंदा खरीप हंगाम बहरला...
शाहू कृषी महाविद्यालयाच्या...कोल्हापूर : सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी...
खर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः...औरंगाबाद : महाआघाडी सरकारने राज्यातील अतिवृष्टी,...
परभणी कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे...परभणी ः राज्यातील सर्व कृषी विद्यापीठातील अधिकारी...
पीक नुकसानप्रश्नी शेतकरी संघर्ष समितीचा...परभणी ः परतीच्या मॉन्सून पावसामुळे, धरणातील पाणी...
हापूस विक्री, निर्यातीला प्रोत्साहनपर...रत्नागिरी ः कोकणच्या हापूसला भौगोलिक मानांकन (...
तुरीवरील शेंग पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक...तुरीवरील शेंग पोखरणाऱ्या अळीची अन्य पर्यायी नावे...
सांगलीत गूळ सरासरी ३६३३ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २७)...
गिरणा, हतनूरमधून मिळणार रब्बीसाठी...जळगाव ः जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गिरणा...
खानदेशात कांदा लागवडीवर परिणाम होणारजळगाव ः खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
महाबीजच्या सौर ऊर्जाचलित गोदामाचे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारे...
बॅलन्सशीट डोळ्यांसमोर ठेवून दिवाळी...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव कारखाना प्रशासनाने...
कृषी अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये ः...अमरावती : मोर्शी तालुक्‍यात जून ते ऑगस्ट या...
नांदेडमधील शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने...नांदेड : जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात...