सोयाबीन उत्पादकांनी टार्गेट ठेवूनच विक्री करावी

मध्य प्रदेशात सोयाबीनची आवक हळूहळू वाढत आहे. तर महाराष्ट्रात आवक सुरू झाली. सध्या सोयाबीनमध्ये १५ ते ३५ टक्क्यांपर्यंत आर्द्रता आहे. तरीही किमान सरासरी ४२०० ते ६५०० रुपये, तर कमाल ६५०० ते ८५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
Soybean growers should sell with a target
Soybean growers should sell with a target

पुणे : मध्य प्रदेशात सोयाबीनची आवक हळूहळू वाढत आहे. तर महाराष्ट्रात आवक सुरू झाली. सध्या सोयाबीनमध्ये १५ ते ३५ टक्क्यांपर्यंत आर्द्रता आहे. तरीही किमान सरासरी ४२०० ते ६५०० रुपये, तर कमाल ६५०० ते ८५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती बघता सोयाबीन यंदाही भाव खाणार असून, शेतकऱ्यांनी किमान पाच हजार रुपये टार्गेट ठेवून बाजाराचा अभ्यास करूनच विक्री करावी, असे आवाहन जाणकारांनी केले आहे.

मध्य प्रदेशात दिवसेंदिवस सोयाबीनची आवक हळूहळू वाढत आहे. १४ आणि १५ सप्टेंबरला सरासरी २५ हजार पोत्यांची राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये आवक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मध्य प्रदेशातील इंदूर, महू, धार, देवास, बदनावर, बड़ नगर, खिरकिया, खाते गाव आणि हरदा आदि बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढत आहे. मध्य प्रदेशातील महू येथे सरासरी ८००० पोती, खाते गाव येथे २५००, हरदा येथे २०००, धार येथे ८००, आणि देवास येथे ६५० पोत्यांची सरासरी आवक होत आहे. 

सुरुवातीच्या दराने शेतकऱ्यांमध्ये समाधान देशभरातील काही बाजार समित्यांमध्ये अल्प प्रमाणात सोयाबीनची आवक होत आहे. मात्र उत्पादक पट्ट्यांत सुरू असलेल्या पावसामुळे या सोयाबीनमध्ये आर्द्रतेचे प्रमाण १५ ते ३५ टक्क्यांपर्यंत असल्याचे सूत्रांनी सांगितले. परंतु मोठी टंचाई असल्याने या सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. मात्र आवकेचा हंगाम अद्याप सुरू झालेला नाही. अत्यल्प आवक असल्याने व्यापारी चढ्या दराने खरेदी करत आहेत. परंतु ऑक्टोबरमध्ये आवक वाढल्यानंतर काही प्रमाणात दर दबावात येतील. मात्र, बाजारातील स्थिती बघता सोयाबीन तेजीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा अंदाज घेऊन किमान पाच हजार रुपये दराचे टार्गेट ठेऊन योग्य वेळी विक्री करावी, असे आवाहन शेतीमाल बाजार विश्‍लेषक दिनेश सोमाणी यांनी केले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com