सोयाबीन उत्पादकांना भरपाईसाठी पाठपुरावा करणार ः भुयार

सुरुवातीला उगवणविषयक समस्यांचा सामना सोयाबीन उत्पादकांना करावा लागला. त्यानंतर आता हे पीक कीड-रोगांने पोखरल्याने उत्पादकता प्रभावित होणार आहे. अशा बाधीत क्षेत्राची आमदार देवेंद्र भुयार यांनी पाहणी करून सर्वेक्षणाचे निर्देश महसूल व कृषी अधिकाऱ्यांना दिले.
Soybean growers will be pursued for compensation: Bhuyar
Soybean growers will be pursued for compensation: Bhuyar

अमरावती : सुरुवातीला उगवणविषयक समस्यांचा सामना सोयाबीन उत्पादकांना करावा लागला. त्यानंतर आता हे पीक कीड-रोगांने पोखरल्याने उत्पादकता प्रभावित होणार आहे. अशा बाधीत क्षेत्राची आमदार देवेंद्र भुयार यांनी पाहणी करून सर्वेक्षणाचे निर्देश महसूल व कृषी अधिकाऱ्यांना दिले.

मोर्शी, वरुड तालुक्यात सोयाबीन लागवड क्षेत्र अधिक आहे. कोळविहिर, मुदखेड, रिद्धपूर, डोमक ही गावे सोयाबीन उत्पादक म्हणून ओळखले जातात. हंगामाच्या सुरुवातीला निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा पुरवठा झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार- तिबार पेरणीची वेळ आली होती. त्यानंतर आता पिकावर कीड-रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. परिपक्व होण्याच्या अवस्थेत असलेल्या शेंगा कीड रोगांमुळे जमिनीवर गळून पडत असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

खोडकीड, चक्रभुंगा या किडींचा प्रादुर्भाव सोयाबीनवर झाला असल्याने क्विंटल तर सोडा काही किलो उत्पादकतेची अपेक्षा देखील शेतकऱ्यांना नाही. शासनाने सर्वेक्षण व पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. त्याची दखल घेत आमदार देवेंद्र भुयार यांनी प्रादुर्भावग्रस्त पिकाची पाहणी केली. कोळविहिर, रिद्धपूर, मुदखेड, डोमक या गावाला त्यांनी भेटी दिल्या. दुबार-तिबार पेरणी करूनही पिकावर कीडरोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यावरुनच हंगामात निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा पुरवठा झाला यावर शिक्कामोर्तब होते असा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला.

त्यामुळे कंपन्यांवर कारवाईची मागणी देखील शेतकऱ्यांकडून करण्यात आली. पाहणीनंतर शेतकऱ्यांशी संवाद साधताना नुकसानभरपाई करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे व कृषी आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण व पंचनामे करण्याचे निर्देशही आमदार भुयार यांनी यावेळी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com