Agriculture News in Marathi Soybean harvest rate Up to three thousand per acre | Page 3 ||| Agrowon

सोयाबीन कापणीचा दर  एकरी तीन हजारांपर्यंत 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 सप्टेंबर 2021

या हंगामात लागवड केलेले कमी कालावधीचे सोयाबीन वाण काढणीसाठी तयार होत आहे. या वर्षी सोयाबीन मळणी प्रतिबॅग अडीच ते तीन हजारांपर्यंत गेल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

अकोला : या हंगामात लागवड केलेले कमी कालावधीचे सोयाबीन वाण काढणीसाठी तयार होत आहे. या वर्षी सोयाबीन मळणी प्रतिबॅग अडीच ते तीन हजारांपर्यंत गेल्याचे शेतकरी सांगत आहेत. शिवाय काही ठिकाणी मजुरांचीही समस्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच भेडसावू लागली आहे. 

या विभागात सोयाबीन हे खरीपातील प्रमुख पीक आहे. यंदाही वऱ्हाडात सोयाबीनची लागवड सुमारे नऊ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर झालेली आहे. यात प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यात ३ लाख ८८ हजार, अकोल्यात २ लाख २२ हजार आणि वाशीम जिल्ह्यात ३ लाख २ हजार हेक्टर एवढी सोयाबीनची लागवड झालेली आहे. सोयाबीनमध्ये प्रामुख्याने जेएस ३३५ या वाणाचे क्षेत्र अधिक आहे. ही सोयाबीन येत्या १५ दिवसांत सर्वत्र काढणीसाठी तयार होत आहे.

काही कमी कालावधीचे सोयाबीन वाण शेतकऱ्यांनी पेरले होते. त्यांची काढणी सुरू सुद्धा झाली आहे. आता एकाच वेळी सोयाबीनची काढणी सुरू होणार असल्याने शेतकरी आतापासूनच मजुरांची व्यवस्था करू लागले. मजुरांच्या टोळ्या सोयाबीनच्या उभ्या पिकाची कापणीसाठी बोलणी करीत आहेत.

मालेगाव, वाशीम भागात सोयाबीनची एक बॅग (एक एकर) लागवड क्षेत्रासाठी अडीच ते तीन हजारांपर्यंत मागणी केली जात आहे. तर मजुरांची एक जोडी ९०० ते १००० रुपये प्रतिदिवस मजुरी मागत आहे. अतिपावसामुळे शेतरस्ते खराब झालेले आहेत. शेतांमध्येही ओलावा असल्याने यंत्रांचा वापर यंदा कमी प्रमाणात होत आहे. 

प्रतिक्रिया
हवामान खात्याने यंदा पावसाचा अंदाज ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दाखवला आहे. पुढील १५ दिवसांत सोयाबीनची काढणी करायची आहे. अशा स्थितीत सोयाबीन कापणीसाठी मजुरांची जुळवाजुळव आतापासून करावी लागत आहे. मजुरांची समस्या असल्याने तीन हजारांपर्यंत एकरी दर मागितल जात आहे. 
-विनोद पाटील, शेतकरी, सुडी, जि. वाशीम 
 

प्रतिक्रिया

आमच्या भागात प्रति एकरी तीन हजारांप्रमाणे सौदे झालेले आहेत. गावात सोयाबीन सोंगणी मशीन असल्याने मजुरांची अडचण भासलेली नाही. या वर्षी काही जणांनी लवकर येणाऱ्या सोयाबीन वाणांची पेरणी केल्याने व काहींनी थोड्या उशिरा येणाऱ्या जातींचा पेरा केल्याने काढणीची स्पर्धा आमच्याकडे तरी नाही. 
-मोहन जगताप, शेतकरी, वळती, जि. बुलडाणा  


इतर बातम्या
अनुदानित हरभरा बियाणे उपयोगात आणावे :...नाशिक : ‘‘राज्यात २४ ऑक्टोबरपर्यंत हरभरा प्रमाणित...
नांदेड जिल्हा बॅंकेची मदार २३०...नांदेड : नांदेड जिल्हा बॅंकेत कर्मचाऱ्यांची वानवा...
किसान रेल्वेला सोलापुरातून प्रतिसादसोलापूर ः मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून किसान...
खानदेशात रब्बीसाठी पीककर्जाचे वितरण सुरूजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची तयारी सुरू आहे....
धर्माबादेत डीएपीची खताची कृत्रीम टंचाईनांदेड : धर्माबाद येथील कृषी सेवा केंद्र चालक...
जळगाव जिल्ह्यात पाणीपातळीत वाढजळगाव ः नवरात्रोत्सवानंतर जिल्ह्याला परतीच्या...
सोलापूर जिल्ह्यात यंदा हंगामात तीन लाख...सोलापूर ः जिल्ह्यातील गाळप हंगाम सुरू झाला आहे....
हमीभाव खरेदी केंद्राचा चेंडू राज्य...नागपूर ः भारतीय कापूस महामंडळाने खुल्या बाजारातून...
जळगाव जिल्हा बँकेत  मविआ विरूद्ध भाजप...जळगाव : काँग्रेसने भाजपसोबत सर्वपक्षीय पॅनलमध्ये...
हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावलाअकोला ः मागील ४८ तासांत वऱ्हाडातील अकोला, वाशीम,...
हेकेखोर विमा कंपन्यांनी वेठीस धरलेपुणे ः शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी...
ओल्या दुष्काळाची घोषणा करा अकोला : विदर्भ, मराठवाड्यात मागील दोन दिवसांत...
पुण्यातील धरणांतून विसर्ग बंदपुणे : परतीचा पाऊस राज्यातून परतल्याने पावसाने...
राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
नगर जिल्ह्यात निम्म्या सोयाबीनची नासाडीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात...
मॉन्सूनोत्तर पावसाने पुन्हा दाणादाणनाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या झळा शेतकरी सोसत...
अन्यथा स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार :...नागपूर : केंद्र आणि राज्य सरकारने आपसात काय गोंधळ...
सरकार साखर उद्योगासह ऊस उत्पादकांच्या...सोलापूर ः ‘‘साखर उद्योग शेतकऱ्यांचा आहे....
सोलापूर जिल्ह्यात ऊसबिलाची थकबाकी मिळेनासोलापूर ः जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामाला सुरवात...
आदिवासी वस्तीच्या पुनर्वसनासाठी लवकर...नाशिक : ‘‘शेतकरी असो वा शेतमजूर यांची प्रगती कशी...