Agriculture news in marathi, Soybean harvesting, cotton picking in Parbhani, Hingoli district | Page 2 ||| Agrowon

परभणी, हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन काढणी, कापूस वेचणी खोळंबली

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन, कापूस पिकांचे अतोनात नुकसान झाले. सुगीच्या कामांचा खोळंबा झाला आहे.

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन, कापूस पिकांचे अतोनात नुकसान झाले. सुगीच्या कामांचा खोळंबा झाला आहे.

दरम्यान, या दोन जिल्ह्यांतील अनेक मंडलांत रविवारी (ता.१७) दुपारनंतर पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. परभणी जिल्ह्यातील ४३ मंडलांत सोमवारी (ता.१८) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. ऊर्ध्व भागातील पाण्याची आवक वाढल्यामुळे रविवारी (ता.१७) सायंकाळी येलदरी धरणाच्या सहा दरवाजांव्दारे नदी पात्रात १५ हजार ३५९ क्युसेकने विसर्ग सुरु करण्यात आला होता.

हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडलांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. औंढा नागनाथ तालुक्यातील येळेगाव, साळणा मंडलात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कापणी केलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले.

येलदरी धरणातील विसर्गामुळे पाण्याची आवक वाढली. त्यामुळे रविवारी रात्री सिद्धेश्वर धरणाच्या बारा दरवाजांव्दारे २५ हजार क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला. पाण्याच्या आवकेनुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येईल. त्यामुळे पूर्णा नदी काठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना पूर्णा पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आल्या आहेत.

मंडलनिहाय पाऊस (१० मिमीच्या पुढे)

परभणी जिल्हा आडगाव १५.८
हिंगोली जिल्हा  डिग्रस कऱ्हाळे १३.५, नांदापूर १५, टेंभुर्णी १३.३, औंढानागनाथ २८.३, येळेगाव ३९.५.

 


इतर बातम्या
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कृषी समितीच्या...सिंधुदुर्गनगरी ः ‘‘बियाणे किट वितरण आणि...
सांगली जिल्ह्यात ‘किसान सन्मान’ची वसुली...सांगली : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील अपात्र...
सिद्धेश्‍वर कारखान्याच्या चिमणी ...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात गाळपात...औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड...
मराठवाड्यातील ८७५ मोठ्या, मध्यम, लघू...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७५ मोठ्या, मध्यम, लघू...
नाशिक ः सिन्नरच्या पाणी प्रकल्पाचा...नाशिक : नाशिक व सिन्नरच्या विकासासाठी आवश्यक पाणी...
जळगाव जिल्ह्यात १७ हजार बेडची सज्जता जळगाव ः जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या...
नांदेड जिल्ह्यात पाच लाख खातेदारांना ‘...नांदेड जिल्ह्यात : पंतप्रधान किसान सन्‍मान निधी (...
निविष्ठा परवान्यांमधील ‘दुरूस्ती’ आता...पुणे ः गुणनियंत्रण विभागातील गैरव्यवहाराला आळा...
ऊसतोड वजावट रद्द करावी पुणे : राज्यात यंत्राच्या साहाय्याने होणारी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची...पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने गारठा वाढला...
गोदावरी-वैनगंगा नदीजोड प्रकल्प अद्याप...नागपूर : महागाई आणि भूखंडाच्या दरापेक्षाही वेगाने...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांच्या...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द झाल्यानंतर आता मोदी...
कृषी कायदे मागे घेण्यावर संसदेचे...नवी दिल्ली ः संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
वीजजोड जबरदस्तीने तोडल्यास जशास तसे...सांगली ः महावितरण कंपनीने शेतीपंपांची वीजबिल वसूल...
राजस्थानमधील शेतकऱ्यांची  मोहरी आणि...पुणे ः रब्बी हंगाम २०२०-२१ मधील मोहरी आणि गव्हाला...
गोदावरी, पैनगंगा उपखोऱ्याची तूट भरून...औरंगाबाद ः ‘‘गोदावरी, पैनगंगा उपखोऱ्याची तूट भरून...
कृषी विजबिले अवास्तवअकोला ः ग्रामीण भागात सध्या एकीकडे रब्बीची लगबग...
खानदेशात अनेक गावांमधील शिवारात वीज बंद जळगाव ः  खानदेशात जळगाव, धुळे, नंदुरबारमधील...
अवकाळीच्या सावटामुळे द्राक्ष पट्ट्यात...नाशिक : गेल्या काही वर्षांपासून पूर्वहंगामी...