सातारा जिल्ह्यात सोयाबीन काढणीत पावसाचा खोडा 

सोया बीन काढणी पावसाची अडचण
सोया बीन काढणी पावसाची अडचण

सातारा ः जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सध्या सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकांची मोठी हानी सुरू आहे. पावसाने उघडीप दिली नाही, तर सोयाबीन पीक हातचे जाणार असल्याने शेतकऱ्यांचे दिवाळीच्या सणाचे अर्थकारण बिघडणार आहे.

जिल्ह्यात खरिपात खरीप ज्वारी, भात, बाजरी, भुईमूग शेंग ही प्रमुख पिके समजली जात होती. मात्र, मागील दहा वर्षांपासून सोयाबीनच्या क्षेत्रात टप्पाटप्प्याने क्षेत्रात वाढ होत गेली आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून सोयाबीन हे खरिपातील प्रमुख पीक झाल्याने कृषी विभागाच्या सर्वसाधारण क्षेत्रातही वाढ झाली आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे ५३ हजार ७५० हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. या खरिपात सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा जास्त म्हणजेच ६० हजार हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे.

खरिपातील केलेल्या सोयाबीनचे पैसे दिवाळीच्या सणाला उपयोगी ठरत असल्याने सोयाबीन क्षेत्रात वाढ झाल्याचे शेतकरी सांगतात. हंगामाच्या सुरवातीस पावसाचे झालेले उशिरा आगमनाने नापेर क्षेत्र राहण्याची शक्‍यता होती. मात्र, जुलै महिन्याच्या सुरवातीस झालेल्या पावसामुळे पेरणीच्या कामांना गती आली होती. जिल्ह्यात खरिपात हंगामात ६० हजार हेक्‍टरपेक्षा अधिक म्हणजेच ११५ टक्के पेरणी झालेली आहे.

सोयाबीन भरणीच्या वेळी अतिवृष्टी झाल्याने आंतरमशागतीची कामे करता आली नव्हती. यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात तण आले आहे. परिणामी, सोयाबीनच्या वाढीवर परिणाम झाला होता. एवढ्या संकटातून आलेल्या सोयाबीन परतीचा व सध्या सुरू असलेल्या पावसामुळे सध्या नुकसान सुरू आहे. काढून ठेवलेले सोयाबीन भिजल्याने हे सोयाबीनवर डाग पडतात.

या सोयाबीनचा दर ४०० ते ५०० रुपये कमी दर मिळत आहे, तसेच शेतात उभे असलेले सोयाबीन झडू लागले आहे. शेतात पाणी असल्याने सोयाबीन काढणी आणि मळणी करता येत नसल्याने हे उभे पीक डोळ्यासमोर जाणार असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातवरण झाले आहे. एकूणच परिस्थिती बघता या अतिपावसामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान होणार आहे असल्याने दिवाळीसारख्या प्रमुख सणास आर्थिक गणिते बिघडणार असल्याने गोड दिवाळी कडू होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

कमी दराने खरेदी उत्तम प्रतीच्या सोयाबीनची ३३०० ते ३४०० रुपये क्विंटल दराने खरेदी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेऊन हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी केली जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीत वाढ होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com