सोयाबीनच्या गंज्या वाहून गेल्या 

मराठवाड्यामध्ये रविवारी (ता.१७) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये सरासरी २६.२ मिमी पाऊस झाला. हिंगोली, परभणी, नांदेड, जालना, लातूर, बीड या सहा जिल्ह्यांतील २७ मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली.
सोयाबीनच्या गंज्या वाहून गेल्या  The soybean husks were carried away
सोयाबीनच्या गंज्या वाहून गेल्या  The soybean husks were carried away

हिंगोली : मराठवाड्यामध्ये रविवारी (ता.१७) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये सरासरी २६.२ मिमी पाऊस झाला. हिंगोली, परभणी, नांदेड, जालना, लातूर, बीड या सहा जिल्ह्यांतील २७ मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यापैकी १० मंडलांत १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. कयाधू, पूर्णा नदी तसेच अन्य ओढ्या-नाल्यांच्या पुरामध्ये शेतात कापून ठेवलेले सोयाबीन, तसेच गंज्या वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वेचणीला आलेल्या कपाशीसह अन्य खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या सुगीत पावसाने जोर धरल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. उरलासुरला घासदेखील हिरावल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.   मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये शनिवारी (ता.१६) सायंकाळी पाऊस सुरू झाला. शनिवारी रात्रभर तसेच रविवारी (ता. १७) दुपारपर्यंत अनेक भागांत पावसाची झड सुरू होती. हिंगोली जिल्ह्यातील सर्व ३० मंडलांमध्ये सरासरी ६६.१ मिमी पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ तालुक्यातील १३ मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली, तर सहा मंडलांमध्ये १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील ५२ मंडलांमध्ये सरासरी ३१.३ मिमी पाऊस झाला. शेळगाव (ता. सोनपेठ) मंडलात अतिवृष्टी झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ मंडलांमध्ये सरासरी १५ मिमी पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील ४९ मंडलांमध्ये सरासरी ३५ मिमी पाऊस झाला. पाचनवडगाव मंडलात अतिवृष्टी झाली. नांदेड जिल्ह्यातील ८५ मंडलात सरासरी ३१.८ मिमी पाऊस झाला. सात मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. लातूर जिल्ह्यातील ५९ मंडलांमध्ये सरासरी २६.७ मिमी पाऊस झाला. चार मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील ३१ मंडलांत सरासरी ९.३ मिमी पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील ४५ मंडलांमध्ये सरासरी १०.७ मिमी पाऊस झाला. एका मंडलात अतिवृष्टी झाली. 

अतिवृष्टी झालेली मंडले  हिंगोली ः कळमनुरी १४३, वाकोडी १२१, नांदापूर १०२, आखाडाबाळापूर ११७.३, वारंगा ११४, हिंगोली १०९.५, नरसी नामदेव ८४.५, सिरसम ७९.८, बासंबा ८६.३, डिग्रस कऱ्हाळे ८३, खंबाळा ८२.८, डोंगरकडा ७६.३, येळेगाव ७०.३. 

परभणी जिल्हा ः शेळगाव ६८.८. 

जालना ः पाचनवडगाव ९७.८ 

नांदेड ः कुंडलवाडी ८६.८, तळणी ११६.८, निवघा १००.३, मनाठा १११.८, तामसा ६९, पिंपरखेड ६६.८, आष्टी ७२.३. 

लातूर ः बाभळगाव ८७.७, हरंगुळ ६७, कासारबालकुंदा ९१, कासारशिर्शी ६७.८. 

बीड ः पिंपळगाव गाडे १०३.५.  मंडलनिहाय पाऊस (२० मिमीच्या पुढे)  हिंगोली ः माळहिवरा ५९.८, वसमत ३३.८ आंबा ४८.८, गिरगाव ६४.८, हट्टा ३४, टेंभुर्णी ३०.८, कुरुंदा ५२.३, औंढा नागनाथ ३९.८, साळणा ३७.८, जवळा बाजार ३०, सेनगाव ६०.३, गोरेगाव ५०.५, आजेगाव ५८.३, साखरा ४४. पानकन्हेरगाव ४८.३. 

परभणी ः परभणी ३४.५, परभणी ग्रामीण ३८.३, पेडगाव २६.५, जांब २५.८, झरी २८.५, सिंगणापूर ३०.८, दैठणा २९.८, पिंगळी ३३.३, टाकळी कुंभकर्ण ३०.५, जिंतूर ४२.८, सावंगी म्हाळसा ६२.५, बामणी ६३.५, बोरी ३७.८, आडगाव ३३, चारठाणा ४३.३, दूधगाव २३.५, ,सेलू २७, देऊळगाव गात ३६.३, वालूर ३०.३, कुपटा ३७, चिकलठाणा ३३, मोरेगाव ५४, मानववनवत ५१.५, केकरजवळा ३८, कोल्हा ३९.८, ताडबोरगाव ३८.५, रामपुरी ४०.५. पाथरी ४०.५, बाभळगाव ३८.८, हादगाव ३२.३, कासापुरी ४७, सोनपेठ गंगाखेड २४.३,पालम १५, रावराजूर १८.५, ताडकळस २२.३, लिमला ३४.८. 

औरंगाबाद ः कन्नड २०.३, चिंचोली लिंबाजी २५.५, कंरजखेड ३४.८, सिल्लोड २९, निल्लोड ३३.३, भराडी ३२.३, गोलेगाव ४७.५, अजिंठा ५६.५, आमठाणा २८.५, बोरगाव ३२.५, अंभई २२.३, सोयगाव ४०, सावलदरबारा ५०.५, आळंद २१.३, फिरबावडा २०.५, वडोदाबाजार २०.३. 

जालना ः जालना शह ३२, जालना ग्रामीण २८.८, वागरुल २४, नेर ४१.३, शेवडी ४३.३, रामनगर ५०.५,भोकरदन ५१, सिपोरा ३६.५, धावडा ५१.३, अन्वा ५४, पिंपळगाव ४३.८, हस्नाबाद ३७.८, केदारखेडा ५२.५, जाफ्रबाद ३८.८, माहोरा ५०.८, कुंभारझरी ४६, टेंभुर्णी ४४, वरुड ४५.३, धनगरपिंपरी ३७.३, परतूर ४९.५, वाटूर ३७.८, आष्टी २२.८, श्रृष्टी ४१, सातोना ४२.५, बदनापूर २३.८, शेलगाव २१.३, दाभाडी २७.८, बावने पांगरी २९, घनसावंगी ४१.८, राणी उंचेगाव ३०.८, तीर्थपुरी २०३, कुंभार पिंपळगाव २९, आंतरवाली टेंभी २१.३, रांजणी ५१, जांब समर्थ ३२.८, मंठा ४१.८, तळणी ४३, ढोकसळ ३८.५, पांगरी गोसावी ३१, गोलेगाव ६२.५, सिंधी २६.८, अर्धापूर ५१.५, दाभड २९.८, मालेगाव २६, बरबडा २१.५, कुंटुर ३७, नरसी २३, नायगाव ३३.८, मांजरम ५०. 

नांदेड ःनांदेड रूरल २०.३, वसरणी ३४.३, तरोडा ३१, वाजेगाव ३२.८, बिलोली ५९.८, सगरोळी ३०.५, लोहगाव २६.३, रामतीर्थ २७.८, मुखेड ३४, जांब ५४, जाहूर २६, चांडोळा २७.५, बाऱ्हाळी २५.३, मुक्रमाबाद ३६, कुरुला ६४.८, फुलवल २४, पेठवडज ३९.३, बारूळ ४५.८, डिग्रस ६४.५, हादगाव ५५.८, खानापूर २१.३, किनवट ३, बोधडी ३१.८, इस्लापूर ३४.८, जलधारा २८.५, शिवणी ५८, दहेली २७.५, मुदखेड २२.५, बारड २८.५, हिमायतनगर ६३, जवलगाव ६१.३, सरसम ४८.३, माहूर २७.५, वानोळा २१.८, वाई २२, सिंदखेड २३.५, धर्माबाद ३०, करखेली २५. 

लातूर ः लातूर ६२.८, गातेगाव २३.३, तांदुळजा ३०.३, चिंचोली ६३.३, औसा ३१.८, लामजना ४४, मातोळा २४.३, भादा ५०.३, बेलकुंद ४८.८, किनी ३५.८, किल्लारी ४०.३, अहमदपूर २५.५, शिरुर २२.८, हाडोळती २२.३, निलंगा ४६.५, पानचिंचोली ३५.३, आरुड ५९.८, आंबुलगा २७, मदनसुरी ३६.८, हलगरा २३.८, भातमुंगली ३५.८, वाढवणा २६.५, चाकूर २६.५, वडवळ ३५.५, शेलगाव २०, झरी २५.३, आष्टा २७.३, बोरोळ ३४, जळकोट २८.५, घोणसी २५. 

उस्मानाबाद ः उमरगा ३५.५, डाळिंब ४७, नारंगवाडी ३८, मुळज ३६, मुरुम ४१, जेवळी २९.३.  बीड जिल्हा ः गंगामसला ४८, किट्टीआडगाव २३.३, नित्रुड २२.३, दिंद्रुड २६.३, पातोडा २९.५, धर्मापुरी ३०.८, नागापूर ४८.३, सिरसाळा २८.५, धारूर २७.३, तेलगाव २०.५, तीनतारवाडी ३२.३. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com