Agriculture news in marathi, Soybean, maize, wheat prices stable; in Millet fluctuations | Agrowon

सोयाबीन, मका, गव्हाचे दर स्थिर; बाजरीत चढ-उतार

संतोष मुंढे
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात सोयाबीन, मका, गव्हाचे दर स्थिर, तर बाजरीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाला. सुरुवातीला लहरी पावसाने घात केल्याने उडीद, मुगाच्या उत्पादनात मोठा फटका बसला. शेतकऱ्यांना किमान दर मिळावे म्हणून हमीदराची खरेदी केंद्रे सुरू आहेत. खुल्या बाजारात सोयाबीन, उडीद, मुगाला चांगले दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा या खरेदी केंद्राकडे कल नसल्याची स्थिती आहे. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात सोयाबीन, मका, गव्हाचे दर स्थिर, तर बाजरीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाला. सुरुवातीला लहरी पावसाने घात केल्याने उडीद, मुगाच्या उत्पादनात मोठा फटका बसला. शेतकऱ्यांना किमान दर मिळावे म्हणून हमीदराची खरेदी केंद्रे सुरू आहेत. खुल्या बाजारात सोयाबीन, उडीद, मुगाला चांगले दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा या खरेदी केंद्राकडे कल नसल्याची स्थिती आहे. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ११ नोव्हेंबरला बाजरीची ४१४ क्‍विंटल आवक झाली. तिचे दर १६०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ६४८ क्‍विंटल आवक झालेल्या मक्याला ९७५ ते ११०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. सोयाबीनची आवक ४० क्‍विंटल, तर दर ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ५० क्‍विंटल आवक झालेल्या गव्हाला १९५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १३ नोव्हेंबर रोजी बाजरीची ३५५ क्‍विंटल आवक झाली. तिला १५७५ ते २२२५ रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. मक्याची आवक ६५३ क्‍विंटल, तर दर १००० ते ११७५ रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ११ क्‍विंटल आवक झालेल्या सोयाबीनला २५०० ते ३६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

बाजरीची १४ नोव्हेंबर रोजी २९१ क्‍विंटल आवक झाली. तिला १६०० ते १९११ रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३ क्‍विंटल आवक झालेल्या हरभऱ्याचे दर ३६५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. मक्याची आवक ६२५ क्‍विंटल, तर दर ९७५ ते १२५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १२५ क्‍विंटल आवक झालेल्या सोयाबीनचे दर ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १२ क्‍विंटल आवक झालेल्या गव्हाला १९५० ते २३४४ रुपये दर मिळाला. 

मक्याची १६ नोव्हेंबर रोजी ८५५ क्‍विंटल आवक झाली. त्यास १००० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २१३ क्‍विंटल आवक झालेल्या बाजरीचे दर १५०५ ते २००० रुपये राहिले. १८ क्‍विंटल आवक झालेल्या सोयाबीनला ३००० ते ३६०० रुपयांचा दर मिळाला. सहा क्‍विंटल आवक झालेल्या गव्हाचे दर १९५० ते २२२५ रुपये राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. खुल्या बाजारामध्ये उडदाला प्रतिक्विंटल ७ हजार ३०० रुपयांपर्यंत, मुगाला प्रतिक्विंटल सहा हजार ९७१ रुपयांपर्यंत, तर सोयाबीनला ३ हजार ८०० ते ३ हजार ९०० रुपये भाव मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
शेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा...नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या...
कृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यचपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त...
कडधान्यवर्गीय बियाणे उत्पादकांना अनुदान...अकोला  ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत...
अमरावती ‘एसआयटी’कडूनही अजित पवार निर्दोषमुंबई : नागपूर विभागातील सिंचन घोटाळ्यापाठोपाठ...
नांदेड जिल्ह्यात कृषी योजनेंतर्गत १...नांदेड : जिल्हा परिषदेच्या कृषी...
पुणे विभागात गळीत हंगामात १८ साखर...पुणे : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत...
खानदेशात ज्वारीची आवक नगण्य, दरही...जळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
नगर जिल्ह्यात पाण्याअभावी २४० पाणी...नगर : आक्टोबर महिन्यात जिल्हाभर जोरदार पाऊस...
जळगाव जिल्ह्यात सिंचनासाठी धरणांतून पाच...जळगाव  ः पावसाळ्यात सरासरीच्या तीस टक्के...
सोलापुरात दरवाढीनंतर कांद्याच्या आवकेत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारा जिल्ह्यात रब्बी पीककर्जाचे सात...सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी...
‘पांडुरंग', 'विठ्ठल’च्या निवडणुकांकडे...सोलापूर : आगामी वर्षात जिल्ह्यातील आघाडीच्या...
शेतीमधील गरज ओळखा ः डॉ. सिंगजालना : ‘‘कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी...
सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी तीन...सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी...
लोणंद बाजार समितीत कांद्याला ११...लोणंद, जि. सातारा : कांद्याची आवक घटल्याने लोणंद...
किमान तापमानात घसरण, थंडीत चढ-उतार...महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीवर उत्तर दिशेने...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...सिंधुदुर्ग : गेले पाच दिवस जिल्ह्यात असलेल्या...
उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावासातारा : ‘‘उसाला प्रतिटन चार हजार रुपये द्या, दोन...
टेंभू, ताकारी, म्हैसाळच्या पूर्णत्वाची...सांगली : टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या...
चोरट्यांपासून कांद्याच्या रक्षणासाठी...नगर ः बाजारात टंचाई असल्याने महिनाभरापासून...