Agriculture news in marathi, Soybean, maize, wheat prices stable; in Millet fluctuations | Agrowon

सोयाबीन, मका, गव्हाचे दर स्थिर; बाजरीत चढ-उतार

संतोष मुंढे
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात सोयाबीन, मका, गव्हाचे दर स्थिर, तर बाजरीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाला. सुरुवातीला लहरी पावसाने घात केल्याने उडीद, मुगाच्या उत्पादनात मोठा फटका बसला. शेतकऱ्यांना किमान दर मिळावे म्हणून हमीदराची खरेदी केंद्रे सुरू आहेत. खुल्या बाजारात सोयाबीन, उडीद, मुगाला चांगले दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा या खरेदी केंद्राकडे कल नसल्याची स्थिती आहे. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात सोयाबीन, मका, गव्हाचे दर स्थिर, तर बाजरीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाला. सुरुवातीला लहरी पावसाने घात केल्याने उडीद, मुगाच्या उत्पादनात मोठा फटका बसला. शेतकऱ्यांना किमान दर मिळावे म्हणून हमीदराची खरेदी केंद्रे सुरू आहेत. खुल्या बाजारात सोयाबीन, उडीद, मुगाला चांगले दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा या खरेदी केंद्राकडे कल नसल्याची स्थिती आहे. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ११ नोव्हेंबरला बाजरीची ४१४ क्‍विंटल आवक झाली. तिचे दर १६०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ६४८ क्‍विंटल आवक झालेल्या मक्याला ९७५ ते ११०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. सोयाबीनची आवक ४० क्‍विंटल, तर दर ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ५० क्‍विंटल आवक झालेल्या गव्हाला १९५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १३ नोव्हेंबर रोजी बाजरीची ३५५ क्‍विंटल आवक झाली. तिला १५७५ ते २२२५ रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. मक्याची आवक ६५३ क्‍विंटल, तर दर १००० ते ११७५ रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ११ क्‍विंटल आवक झालेल्या सोयाबीनला २५०० ते ३६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

बाजरीची १४ नोव्हेंबर रोजी २९१ क्‍विंटल आवक झाली. तिला १६०० ते १९११ रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३ क्‍विंटल आवक झालेल्या हरभऱ्याचे दर ३६५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. मक्याची आवक ६२५ क्‍विंटल, तर दर ९७५ ते १२५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १२५ क्‍विंटल आवक झालेल्या सोयाबीनचे दर ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १२ क्‍विंटल आवक झालेल्या गव्हाला १९५० ते २३४४ रुपये दर मिळाला. 

मक्याची १६ नोव्हेंबर रोजी ८५५ क्‍विंटल आवक झाली. त्यास १००० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २१३ क्‍विंटल आवक झालेल्या बाजरीचे दर १५०५ ते २००० रुपये राहिले. १८ क्‍विंटल आवक झालेल्या सोयाबीनला ३००० ते ३६०० रुपयांचा दर मिळाला. सहा क्‍विंटल आवक झालेल्या गव्हाचे दर १९५० ते २२२५ रुपये राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. खुल्या बाजारामध्ये उडदाला प्रतिक्विंटल ७ हजार ३०० रुपयांपर्यंत, मुगाला प्रतिक्विंटल सहा हजार ९७१ रुपयांपर्यंत, तर सोयाबीनला ३ हजार ८०० ते ३ हजार ९०० रुपये भाव मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


इतर बाजारभाव बातम्या
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये वांगी २००० ते ५००० रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात गवार २५०० ते ४००० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
सोलापुरात ढोबळी मिरची, टोमॅटो दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये हिरवी मिरचीला मागणी...नाशिक : येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कांदा, बटाट्याच्या दरात सुधारणा,...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची प्रतिक्विंटल...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत काकडी ६०० ते १२०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात उडीद २५०० ते ८००० रूपयेनगरमध्ये ४५०० ते ५५०० रूपये नगर  : नगर...
नाशिकमध्ये कारले १००० ते २६६७ रूपयेनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (ता.८...
जळगावात आले ३५०० ते ५२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर बाजार समितीत कांद्याचे दर टिकूननगर ः नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर गेल्या पंधरा...
सोलापुरात टोमॅटो, वांगी, हिरवी मिरचीत...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये डाळिंबांच्या आवकेत घट, दरात...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नगरमध्ये गवार, शेवग्याच्या दरात तेजी नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवक, मागणीत वाढपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये बटाटे २५०० ते २८०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...