agriculture news in Marathi soybean may be magic bean Maharashtra | Agrowon

सोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

 देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट नोंदविण्यात आली असली तरी पोषक वातावरणामुळे बंपर उत्पादनाचा अंदाज वर्तविला जात आहे. 

नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट नोंदविण्यात आली असली तरी पोषक वातावरणामुळे बंपर उत्पादनाचा अंदाज वर्तविला जात आहे. असे असताना सुद्धा स्थानिक प्रक्रिया उद्योजकांची वाढती मागणी तसेच सोयाबीन ढेपेच्या दरातील तेजीमुळे सोयाबीन चांगला परतावा मिळवून देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

मध्य प्रदेश सोयाबीन उत्पादनात देशात आघाडीवर आहे २०१९-२० या वर्षात मध्य प्रदेशमध्ये ५१.९५ लाख हेक्टरवर सोयाबीन लागवड होती. यावर्षी मध्य प्रदेशमध्ये सोयाबीन लागवड क्षेत्र ५८ लाख हेक्‍टरवर पोचले आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील लागवड क्षेत्रात मात्र घट नोंदविण्यात आली आहे. २०१९-२० या वर्षात ४१ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली होते. यावर्षी ३८ ते ३९ लाखांवर पोहोचले आहे. सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक घेतल्याने हे क्षेत्र कमी झाल्याचा दावा सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाने केला आहे. 

मध्य प्रदेश व महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचाही फटका सोयाबीनला बसला. तसेच अनेक भागांमध्ये खोडकीड, चक्रीभुंगा या किडीने देखील पीक पोखरले. परिणामी उत्पादकता कमी होण्याचा अंदाज या पार्श्वभूमीवर वर्तविला जात होता. परंतु बाजार विश्लेषकांनी मात्र यावर्षी सोयाबीनला अच्छे दिन असल्याचे सांगितले. केंद्र सरकारने ३ हजार ८८० रुपयाचा हमीभाव जाहीर केला आहे. त्याच्या आसपास बाजारात देखील दर राहतील, असा विश्वास विश्लेषकांना आहे. 

व्यापारी कमी दर देण्याची शक्यता 
हमीभावाने सोयाबीन खरेदी करताना त्यात दहा टक्के ओलावा तसेच त्यात काडीकचरा नको असे नियम आहेत. व्यापारी मात्र १२- १३ टक्के ओलावा असलेला माल ३७०० ते ३७५० या दराने खरेदी करतील, अशी माहिती सोयाबीन प्रक्रिया उद्योजकाने दिली. 

प्रतिक्रिया
देशात यावर्षी सुरुवातीला १२५ लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज होता आता ९७ लाख टन उत्पादन होईल अशी स्थिती आहे. गेल्यावर्षी ९० लाख टन उत्पादन होते. महाराष्ट्रात गेल्या वर्षी २७ लाख उत्पादन झाले. या वर्षी त्यात वाढ होत ते ३२ ते ३४ लाख टनापर्यंत पोहोचेल. उत्पादकता वाढत असली तरी सोयाबीन उत्पादकांना हमीभावा इतकेच दर मिळतील यात कोणतीही शंका वाटत नाही. त्यामागे डिओसी दरातील तेजी हे मुख्य कारण आहे. 
- महाविर जैन, सोयाबीन बाजार विश्लेषक. 

राज्यनिहाय लागवड क्षेत्र (लाख हेक्टर) 
मध्य प्रदेशः 
५८ 
महाराष्ट्र ः ३९ 
राजस्थान ः १० 
तेलंगणा ः १ 
कर्नाटका ः ३ 
छत्तीसगढ ः ०.६७ 
गुजरात ः १ 
अन्य  १.९१ 
 


इतर अॅग्रो विशेष
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
बिस्कीट निर्मितीतून महिलांनी घेतली...सांगली जिल्ह्यातील नवेखेड (ता.वाळवा) येथील...
शेतीला मिळाली प्रक्रिया उद्योगाची जोडखोपी (ता.भोर,जि.पुणे) येथील अंजना नारायण जगताप...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...
कृषी सुपर मार्केट ः संकल्पना आणि संधीजागतिकीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेती हा एक आर्थिक...
बदल हवेत दिलासादायकहवामान आधारीत फळपीक विमा योजनेत केळी पिकासाठी...
नैसर्गिक आपत्तीत पीकच नाई, तर बापही...यवतमाळः नैसर्गिक आपत्तीत आमी पीकच नाई, त आमचा...
राज्यात गाईच्या दूध खरेदी दरात कपात नगर ः लॉकडाऊन उघडल्यानंतर दुधाची मागणी वाढल्यावर...
कोरडवाहू, बागायतीसाठी हेक्टरी १० हजार...मुंबई: अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे...
थकबाकीदार ७१ कारखान्यांचे गाळप परवाने ‘...पुणे: राज्यात चालू हंगामात ऊस गाळपासाठी अर्ज...
शेडनेट, फळबागेतून मिळालेल्या ओळखीसह...धुळे जिल्ह्यातील फागणे (ता. धुळे) येथील उमेश व...
कष्ट, नियोजनपूर्वक उभारली आंबा, नारळ,...शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करताना वरवडे (ता. जि...