Agriculture news in Marathi Soybean meal should be imported duty free | Agrowon

सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावी

शनिवार, 15 मे 2021

भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला भिडल्याने विदेशातून सोया पेंड आयात शुल्क लागू न करता आयात करावी, अशी मागणी ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर असोसिएशनने केली आहे.

नागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला भिडल्याने विदेशातून सोया पेंड आयात शुल्क लागू न करता आयात करावी, अशी मागणी ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर असोसिएशनने केली आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील पशुसंवर्धन व दुग्ध विभागाला हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यांनी शिफारशीसह वाणिज्य मंत्रालयाकडे हा प्रस्ताव पाठविल्याने लवकरच देशात सोया पेंडची आयात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पोल्ट्री खाद्यामध्ये २२ टक्के सोया पेंडचा समावेश केला जातो. एका टनामागे २२० किलो सोया पेंड वापरली जाते. मात्र गेल्या हंगामात सोयाबीनची अपेक्षित उत्पादकता मिळाली नाही. त्यासोबतच संततधार पावसामुळे कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढून सोयाबीनची प्रत देखील खालावली. स्थानिक गरज पूर्ण होत नसल्याने सोयाबीनची प्रक्रिया उद्योगातून मागणी वाढली. त्याच्या परिणामी सोयाबीनचे दर सात हजारांच्या पुढे गेले. त्यामुळे सोयाबीन पेंडही महागली. पूर्वी ३५ रुपये किलो असलेली सोया पेंड दुपटीने वाढत ७० रुपये किलो झाल्याची माहिती पोल्ट्री व्यावसायिकांनी दिली.

पोल्ट्री व्यवसायिकांना यामुळे मोठे नुकसान सोसावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता विदेशातून सोया पेंड आयात करावी, अशी मागणी ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनने केली आहे. भारताच्या तुलनेत ब्राझील आणि अमेरिकेतील सोया पेंडच्या दरात प्रति टन १५ हजार रुपयांची तफावत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सोया पेंडची १२ लाख टन आयात करावी, अशी पोल्ट्री व्यावसायिकांची मागणी आहे. पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाला या संदर्भाने प्रस्ताव सादर करण्यात आला. व्यावसायिकांची ही मागणी रास्त असल्याचे लक्षात आल्याने संबंधित विभागाने याला मान्यता देत शिफारशींसह हा प्रस्ताव वाणिज्य मंत्रालयाकडे पाठविला आहे. वाणिज्य मंत्रालयात देखील याला मंजुरी मिळण्याची शक्यता असून, लवकरच आयात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

वायद्यांवर नियंत्रण आणा
वायदे बाजारात सोयाबीन व्यापारावर नियंत्रणाची मागणीदेखील पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाने वाणिज्य मंत्रालयाकडे केली आहे. त्यामुळे सोयाबीन बियाणे दर नियंत्रणात राहतील, अशी अपेक्षा संबंधित विभागाने वर्तविली आहे. या हंगामात सोयाबीन बियाणे दर नियंत्रण न झाल्यास दर गगनाला भिडतील, अशी शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
सातव्या वेतन आयोगासाठी महामंडळांमधील...नगर : राज्यातील विविध महामंडळांमधील अधिकारी-...
रत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूरला ...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी...
चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना...वडाळी जि. अकोला : या हंगामाला सुरुवात होताच...
पशुचिकित्सा व्यावसायिक संघटना करणार...नागपूर : पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या...
जागोजागी होणारी लुट थांबवा, ...नगर : ‘‘राज्यात जागोजागी प्रत्येक क्षेत्रात...
‘घटनादुरुस्ती करून आरक्षण देणे  हाच...कोल्हापूर : घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षण देणे...
कोकणातील डच, पोर्तुगाल वखारींचे होणार...पुणे : भारतातील आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारासाठी...
गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणासाठी ...मुंबई ः गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणाबाबत...
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींना पाच पट...नाशिक : देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग...
आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची इच्छाच...पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्याची राजकीय...
नांदेडमध्ये थकीत ‘एफआरपी’साठी धरणेनांदेड : ऊस गाळप होऊनही पैसे न दिल्याने...
सांगली जिल्ह्यात खरिपाची दहा टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीस प्रारंभ...
आर्थिक दुर्बल घटकांना बियाणे वाटपाचे...नाशिक : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत विविध...
‘विष्णुपुरी’तून ४७१ क्सुसेकने विसर्गनांदेड : गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण...
परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ७४ मंडळांत...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ७४ मंडळांमध्ये...
टोमॅटोवरील टुटा ॲबसोलुटा किडीची ओळख,...टोमॅटो पिकात टुटा ॲबसोलुटा या किडीचा प्रादुर्भाव...
नागपुरात सोयाबीन दरात तेजीनागपूर : सोयाबीन दरातील तेजी कायम असून कळमना...
सागरी शेवाळ उत्पादनात व्यावसायिक संधीसागरी शेवाळ उत्पादनामुळे व्यावसायिक संधी उपलब्ध...
नगरमध्ये दोडका, वांगी, भेंडीच्या दरात...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सांगलीत वीस लाखांचा खतसाठा जप्तसांगली : विना परवाना खत विक्री प्रकल्पावर कृषी...